हिंगोलीकरांची चिंता वाढली ; पुन्हा एका एसआरपीएफच्या जवानाला कोरोनाची लागण
हिंगोलीकरांची चिंता वाढली ; पुन्हा एका एसआरपीएफच्या जवानाला कोरोनाची लागण
हिंगोली - मालेगाव येथून एक २७ वर्षाचा जवान ड्युटी संपवून परत जालना येथील राज्य राखीव दलाच्या कॅम्प मध्ये सहभागी झाला होता.परंतु तो हिंगोलीचा रहिवासी असल्याने तो दोन दिवसांपूर्वी हिंगोलीत दाखल झाला असून कोणालाही न सांगता इतरत्र फिरत होता. मात्र अचानक त्यास त्रास होत असल्याने त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारनंतर त्यास कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने पुन्हा हिंगोली कारांची चिंता वाढली आहे.
मागील शनिवारी मालेगाव व मुंबई येथून कर्तव्य पार पाडून १८३ जवान हिंगोली कडे परत आले होते. त्यातील सहा जणांना कोरोना आयसोलेशन वॉर्डात भरती केले होते. त्यांचे स्वाब नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे पाठविले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाप्रशासनाची चिंता वाढली होती. या सहा जवानांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले जाते.
जिल्हा कोरोनामुक्ती कडे वाटचाल करीत असताना पुन्हा शुक्रवारी त्यात एका जवानाची भर पडली आहे. हा २७ वर्षीय जवान हिंगोलीचा असून तो जालना येथे कार्यरत होता . मात्र काही कारणास्तव मालेगाव येथे कायदा व अंतर्गत सुरक्षेसाठी बंदोबस्तासाठी गेला होता, तेथून या जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यास शनिवारी सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी भरती केले असून त्याचा संपर्कातील ४६ लोकांना रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. कुमारप्रसाद श्रीवास यांनी दिली. या जवानांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याची दिसून आली. शनिवारी या जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. हा जवान हिंगोली तालुक्यातील हिवरा बेल येथील असल्याने येथील संपूर्ण गावाला जिल्हा प्रशासनाने शील ठोकले आहे.यावेळी जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी ,उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे ,यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी गावात तळ ठोकून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेत आहेत.