कोराणामुळे कित्येक नवरदेवांचे लग्न लांबणीवर.... हळदी ऐवजी सँनिटायझर व मास्क लावायची वेळ.
प्रतिनिधी/ शरद राठोड
कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने संबंध जगाला वेठीस धरले आहे. या संसर्गजन्यच्या वाढत्या आजारामुळे प्रशासनसह विविध स्तरावर निर्बंध घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होताना दिसत आहे.या कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकड्यामुळे ज्या मुलांची शुभमंगल सावधान होणार होती,अशा मुलांचे स्वप्न सध्या तरी या आजाराने भंग केल्याचे दिसुन येत आहे.
दरवर्षी ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लग्नाची रेलचेल वाढलेली आपण पाहतो.ऊन्हाळ्याची सुट्टी लागली की,लग्नाच्या बोलणीला सुरुवात व्हायची.परंपरेनुसार लग्नाच्या गाठी जरी परमेश्वरानी बांधल्या असतील तरीही देवबाप्पाच्या मदतीने सुपारी फोडण्यापासुन ते शेवटच्या फेरेपर्यंत संसाराची मुहूर्तमेढ ओढली जायची.
त्यामुळे मजल दर मजल करत कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रभाव पाहता होणारे भावी नवरदेव यांना सध्या तरी हळद लावण्याऐवजी सँनिटायझर लावण्याची वेळ आलेली दिसून येत आहे.
यावर्षी कित्येक नवरदेव ऊन्हाळ्यात आपले लग्न होणार या आशेवर वाट पाहत बसले होते.अशा सर्व नवरदेवाला हळद लावण्याऐवजी घरांतून बाहेर ये-जा करतांना सँनिटायझर लावावे लागत आहे.त्यामुळे लग्नाच्या आनंदाने कपाळावर "मंडळ" लावणार् या भावी नवरदेव व नवरी वधुला तोंडाला मास्क लावण्याने त्यांचा भ्रमनिरास झालेला दिसून येत आहे.
लग्न म्हणले की,समोर असायची ती लगीनघाई,धावपळ ज्यामध्ये पाहुण्यांची ये-जा अन् विविध प्रकारच्या आवडीनिवडी आपण पाहत आलेलो आहे.परंतु ज्या पद्धतीने ही समारंभ,लग्न सोहळे होणार होती,ती आज कोरोनामुळे लांबणीवर गेल्याचे सध्याच्या काळात दिसून येत आहे.याबाबतीत संबंधित जिल्हाधिकारी यांनी लेखी अधिसूचना जाहीर केलेली आहे. ज्यामध्ये कोणतेही धार्मिक, राजकीय,सांस्कृतिक ई त्याचबरोबर विविध पुजा या सर्वावर निर्बंध लाधले आहेत. या अधिसूचनेत संचारबंदी जाहीर करण्यात येत असल्याने सर्वच ठिकाणी भयावह वातावरण तयार झालेले आहे.त्यामुळे यावर्षी जी लग्न समारंभ होणार होती,त्या सर्व लग्न समारंभाला कोरोनाचे ग्रहण लागलेले आहे.