हिंगोलीत पुन्हा दोघे कोरोना पॉझिटिव्ह

हिंगोलीत पुन्हा दोघे कोरोना पॉझिटिव्ह


कोरोना बाधितांची संख्या १६ वर पोहचली ,जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली


हिंगोली -  मुंबई येथून परतलेल्या राज्य राखीव दलाच्या एका जवनासह बारसी येथून वसमत मध्ये आलेल्या अश्या एकूण दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी( ता.२९) प्राप्त झाला असून आता कोरोना बाधितांची संख्या सोळा वर पोहचली असल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.


आजघडीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात हिंगोली एसआरपीएफचे बारा व जालना एसआरपीएफचा एक असे एकूण तेरा जवान पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर जालना येथील एसआरपीएफ जवानाच्या संपर्कातील त्याच्या चार वर्षे पुतण्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे .एकूण चौदा संख्या झाली.


मंगळवारी पुन्हा सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील पाच वर्षाच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या १५ वर गेली असताना (ता.२५) रोजी बारसी येथून वसमत मध्ये कोरंटाइन मध्ये ठेवलेल्या २१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सोळा वर पोहचली आहे.


जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या १७ वर गेली होती. परंतु त्यातील एका व्यक्तीचा अहवाल शासकीय प्रयोग शाळेकडून निगेटिव्ह आल्याने आजघडीला कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची १६ वर  संख्या गेल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने बुधवार पासून तीन मे पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पोलीस विभागाला दिले आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा