चिंताजनक; हिंगोलीत पुन्हा एक जवान पॉझिटिव्ह
चिंताजनक; हिंगोलीत पुन्हा एक जवान पॉझिटिव्ह
हिंगोली - येथील सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल केलेल्या पाच जवाना पैकी चार जणांचे अहवाल सोमवारी सकाळी पाझिटिव्ह आले तर उर्वरित एकाचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून तो जवान ही पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.
येथील एसआरपीएफच्या बारा जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन जवान मुंबई येथे कार्यरत होते.तर दहा जवान मालेगाव येथे कर्तव्यावर होते.(ता.२५) रोजी जालना येथून एक जवान हिंगोलीचा रहिवासी असल्याने तो जालना येथून परत आला. त्याचे थ्रोट स्वाब नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्या जवानाच्या संपर्कातील तो तेथे राहत असलेल्या परिसरातील ९५ व्यक्तींना
आयसोलेशन वॉर्डात क्वारंटाइन करण्यात आले. या सगळ्यांचे थ्रोट स्वाब नमुने औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे तपासणी साठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकूण २८ अहवाल प्राप्त झाले असून, यातील २७ अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर उर्वरित अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. पॉझिटिव्ह आलेल्या तेरा रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून कुठल्याही प्रकारचे गंभीर लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यातील पाचही आयसोलेशन वॉर्डात कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. आजघडीला जिल्ह्यात १३ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची आता डोकेदुखी वाढली आहे .