पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हणांना आर्थिक मदत करावी
जिल्हाकचेरीकडे निवेदनाद्वारे मागणी
हिंगोली - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्याने ब्राह्मण पोराहित्याची गैरसोय होत असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ब्राह्मण पौरोहित्य संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
यावेळी शहरातील ब्राह्मण पौरोहित्य बालाजी जोशी, राजेश जोशी, प्रभाकर ऋषी, अतुल दलाल, धोंडोपंत पाठक, संतोष उन्हाळे, किशोर ऋषी, सुभाष बंडाळे ,अनिरुद्ध शार्दूल, उमेश मुळे, दिवाकर धर्माधिकारी, लक्ष्मीकांत पाठक, प्रतीक जोशी, शुभम पाठक, सचिन घन आदींनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्फत पंतप्रधान मुख्यमंत्री ,यांच्याकडे लॉकडाऊन मुळे घरात बसून राहण्याची वेळ आली असून उपजीविका करण्यास बाहेर पडता येत नाही. त्यामुळे पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा १९ दिवसाचा लॉकडाऊन केला आहे.त्यामुळे उर्वरित दिवसात कुटुंबाची उपजीविका कशी करावी असा गहन प्रश्न पडला आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन गोर गरीब, पालवारील भटक्या कुटुंबाना धान्य, जेवण आदींची व्यवस्था करीत असताना दुसरीकडे शहरातील जवळपास वीस ते पंचवीस कुटुंबाचा गाडा किंवा उदरनिर्वाह हा पौरोहित्य करूनच करावा लागत असे. मात्र लॉकडाऊन मुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.