८४ उमेदवारांची तात्पुरती जेष्ठता यादी जाहीर जिल्हा परिषदेतील अनुकंपा धारकांना दिलासा
८४ उमेदवारांची तात्पुरती जेष्ठता यादी जाहीर
जिल्हा परिषदेतील अनुकंपा धारकांना दिलासा
हिंगोली - जिल्हा परिषदे अंतर्गत अनुकंपा धारक उमेदवारांची डिसेंबर २०१९ अखेर प्राप्त प्रस्तावांची ८४ उमेदवारांची तात्पुरती जेष्ठता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आल्याने जिल्हा परिषदेतील अनुकंपा धारकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना विषाणूमुळे ही जेष्ठता यादी लवकर जाहीर करता आली नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांगलेच मनावर घेतल्याने गुरुवारी८४ उमेदवारांची यादी जाहीर केली. जिल्हा परिषदेमध्ये अनेक जागा रिक्त असून ,शिवाय अनुकंपा धारकांच्या जागेचा तिढा वर्षा नू वर्ष प्रलंबित पडला होता. अखेर सीईओ राधा बिनोद शर्मा,धनवंत कुमार माळी यांनी अनुकंपा उमेदवारांचा प्रश्न निकाली काढला आहे.
उमेदवारांची जेष्ठता यादी गुरुवारी जाहीर केल्यानंतर जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभाग, पंचायत समिती कार्यालयाकडे इमेल द्वारे माहितीस्तव पाठविली आहे. तसेच संकेत स्थळावर देखील उपलब्ध असल्याचे माळी यांनी सांगितले. अनुकंपा नियुक्ती करीता आवश्यक असलेली कागदपत्रे उमेदवाराकडून प्राप्त होत नाहीत, तो पर्यंत त्यांची नावे प्रतीक्षा सूची मध्ये समाविष्ट केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या दिवशी संपूर्ण कागदपत्रे प्राप्त होतील त्याच दिवशी त्यांची नावे प्रतीक्षा सूचीत समाविष्ट केली जाणार आहेत. याची उमेदवारांनी नोंद घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत परिपूर्ण प्रस्तावांची तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आली, त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांचा जेष्ठता यादी मध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास २७ एप्रिल पासून कार्यालयीन वेळेत कागदपत्रांच्या पुराव्यासह आक्षेप मागविण्यात येत असल्याचे माळी यांनी सांगितले.