गायत्री परिवारातर्फे दररोज दोन हजार डब्याचे होतेय वाटप
गायत्री परिवारातर्फे दररोज दोन हजार डब्याचे होतेय वाटप
हिंगोली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र सुरू असलेल्या लॉकडाऊन व सीमाबंदीमुळे बाहेर राज्यातून आलेले अनेक मजुर शहरात अडकले आहेत तसेच हातावर पोट असणारांची कामे खोळबंल्याने ते अडचणीत आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात असलेल्या रुग्ण उपाशीपोटी राहणार नाहीत याची काळजी गायत्री परिवारातर्फे घेतली जात असून दररोज दोन हजार डब्बे पुरविले जात आहेत.
मागच्या काही दिवसापासून लॉकडाऊन व सीमा बंद करण्यात आल्याने, शहरात तेलंगणा, तामीळनाडू, राजस्थान येथील ८०० मजूर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात देखील विविध आजराचे उपचार घेत असलेले रुग्ण हे उपाशीपोटी राहू नये यासाठी येथील गायत्री परिवाराने त्याच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला असून मार्च महिण्यात (ता.२२) पासून या सर्वाच्या भोजनाची सकाळ व सायंकाळी अशी दोन वेळेस व्यवस्था केली जात आहे.
अन्नदानासाठी शहरातील दानशुरांचा पाठबळावर अन्नदानाचा उपक्रम सुरू आहे. यासाठी गायत्री परिवराराचे ६० स्वयंसेवक सहकार्य करीत आहेत. शहरात कोणी उपाशीपोटी राहू नये यासाठी गायत्री परिवाराने पुढाकार घेतला असून त्याला दानशुराचे मोठे सहकार्य लाभाले आहे. पाच हजार लोकापर्यत डब्बे पोहचविण्याची व्यवस्था करण्याचा संकल्प गायत्री परिवाराने केला आहे. या कार्यासाठी मदत करणाऱ्या दानशुराचे गायत्री परिवारातर्फे आभार व्यक्त केले जात असल्याची माहिती गायत्री शक्ती पिठाचे प्रमुख रामचंद्र कयाल यांनी सांगितले.