कोरोनाच्या पाश्वभूमीवर बँक व्यवस्थापकांना आदेश जारी
कोरोनाच्या पाश्वभूमीवर बँक व्यवस्थापकांना आदेश जारी
हिंगोली,दि.15: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय भारत सरकार आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात नागरिकांनी येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनता व त्यांचे आरोग्यास धोका असल्याने त्याकरिता तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीमध्ये PMKY,PMGKY,NSAP व इतर योजनांचे पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून Social Distancing चा भंग होत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या करीता बँकेमध्ये गर्दी टाळण्यासाठी सर्व शाखा व्यवस्थापक यांना खालील नमुद बाबीचे नियोजन करुन त्यांची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
यामध्ये(1) गर्दी टाळण्यासाठी एक ते दोन मिटर अंतरावर गोल / चौकोन आखण्यात यावेत. (2) खातेदार आखलेल्या गोल/चौकोनामध्येच उभे राहतील याचे नियोजन करावे. (3) खातेदारांना टोकन देण्यात यावेत व टोकन नुसारच व्यवहार करावेत. (4) टोकननुसार नंबर आलेल्या खातेदारांना माहिती होण्याकरीता public announcement system बसविण्यात यावी. (5) उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रिकामे जागेत मंडप / शामीयाना उभारण्यात यावा व तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. (6) खातेदार, सुरक्षा रक्षक, बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी मास्क व सॅनिटायझराचा वापर करण्याबाबत सर्व संबंधितांना सांगावे व त्याचे पालन होईल यांची दक्षता घ्यावी. सदर सुचनांची अंमलबजावणी करुन त्याबाबतचे ‘जिओ टॅग फोटो’ सादर करावे, असेही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये निर्देश देण्यात आले आहे.