आमदार रोहित पवाराकडून हिंगोलीला ५०० लिटर सॅनिटायझर 

आमदार रोहित पवाराकडून हिंगोलीला ५०० लिटर सॅनिटायझर


राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा पाठपुरावा 


हिंगोली -  जिल्ह्यात सानिटायझरचा तुटवडा निर्माण झाल्याने  कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे सानिटायझर उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्याला बारामती ऍग्रो तून ५०० लिटर सानिटायझर मोफत उपलब्ध करून दिले .त्यानंतर सानिटायझर थेट जिल्हाधिकारी 
जयवंशी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली.


हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने त्या व्यक्ती पासून संक्रमण टाळण्यासाठी जिल्ह्यात सानिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा पालिकेचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे जिल्ह्याला सानिटायझर उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून बारामती अॅग्रोच्या वतीने हिंगोली जिल्ह्यासाठी ५०० लिटर सॅनिटायझरचा मोफत पुरवठा करण्यात आला.


राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याकडून आपती व्यस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय येथे  सर्व सानिटायझर सुपूर्त करण्यात आले. यावेळी अमित कळासरे, बालाजी घुगे, सुजय देशमुख, मुन्ना इंगोले आदीची उपस्थिती होती. सॅनिटायझरच्या बाजारातील तुटवड्यामुळे अनेक वेळा कोरोना संसर्ग होण्याची भीती प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कर्मचारी यांच्यावर होते.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासन अत्यंत  प्रभावी कामगिरी करीत आहे. प्रत्यक्ष काम करणाऱ्या आरोग्य, पोलिस, महसुल, इतर पालिका विभागाचे कर्मचारी,संबंधितांची अडचण लक्षात घेऊन आ.रोहित पवार यांनी ५०० लीटर सॅनिटायझर जिल्ह्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे.त्यामुळे काही प्रमाणात का होईना कोरोना विरुद्धच्या लढाईचा सामना करण्यासाठी सानिटायझर उपलब्ध झाले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा