हिंगोलीत बंदोबस्तावरून परतलेले १९० जवान विलगीकरण कक्षात
हिंगोलीत बंदोबस्तावरून परतलेले १९० जवान विलगीकरण कक्षात
हिंगोली - मालेगाव, मुंबई येथे बंदोबस्ता वरून परत आलेल्या १९० जवानांना सोमवारी १४ दिवसासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षात राहण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील दोन महिन्यांपूर्वी हिंगोली येथील राज्य राखीव बल गटाचे १९० जवानांच्या दोन अलग तुकड्या मालेगाव तर दुसरी तुकडी मुंबई येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अंतर सुरक्षा बंदोबस्ता साठी गेली होती. यामध्ये मालेगाव येथे ८३ जवान तर मुंबई येथे १०७ जवान बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र त्यात कोरोना विषाणूची भर पडल्याने बाहेर राज्यातून, इतर जिल्ह्यातून परत आलेल्या नागरिकांची आरोग्य यंत्रणे मार्फत तपासणी केली जाते. आणि त्यांना १४ दिवस विलगीकरण मध्ये ठेवले जाते.
बंदोबस्तावरून मालेगाव येथील८३ जणांची तुकडी रविवारी हिंगोली येथे दाखल झाली. तर दुसरी मुंबईला गेलेली १०७ जणांची तुकडी सोमवारी सकाळी दाखल झाली. सध्या मुंबई ,पुणे ,मालेगाव या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने त्यामुळे कोरोना संशयित तर नाहीना अशी भीती व्यक्त होत असल्याने समदेशक मंचक इप्पर यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना याबाबत कल्पना देण्यात आली. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी बंदोबस्ताहून परत आलेल्या राज्य राखीव जवानांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ कदम,यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने या सर्व जवानांची आरोग्य तपासणी केली असता सर्व जवान ठणठणीत असल्याचे दिसून आले. यावेळी कोणालाही कोरोनाची साम्य असलेली लक्षणे दिसून आली नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा मोकळा श्वास सोडला. परंतु खबरदारी म्हणून या १९० राज्य राखीव जवानांना येथील राज्य राखीव बल गट परिसरात असलेल्या स्वतंत्र तयार केलेल्या कक्षात १४ दिवसासाठी विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे १४ दिवस कुठेही बाहेर पडता येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. वेळोवेळी आरोग्य विभागाच्या पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. बंदोबस्ताच्या वेळी कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते का याची देखील चाचपणी केली जात आहे.