*कोरोनाच्या लाँकडाऊन काळात महिलांमध्ये "पापड" बनविण्याची क्रेज*....ग्रामीण भागात महिलांची पापड,दाळीची ची मेजवानी....
प्रतिनिधी / शरद राठोड
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना नावाच्या वाढत्या आजाराचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून पुन्हा लाँकडाऊन वाढविण्यात आलेले आहे.त्यामुळे वारंवार या आजारावर मात करण्यासाठी प्रशासन सामंजस्याने विविध प्रकारच्या भुमिका घेताना दिसत आहे.पण याचं लाँकडाऊन च्या काळात घरां-घरांतील "होम-मिनिस्टर" अर्थातच महिला वर्ग मात्र विविध प्रकारच्या पापडांची मेजवानी तयार करताना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळत आहे.
रेणापूर तालुक्यातील पुर्वकडील येणारी गावे ज्यामध्ये शेरा,पोहरेगांव,पोहरेगांव तांडा,ईट्टी,भोकरंबा,डिघोळ या ठिकाणी महिलांकडून विविध प्रकारचे पापड बनविण्यात मग्न असल्याचे पहावयास मिळत आहे.या भागांत महिलांकडुन बाजरी,शाबुदाणा,बटाटे,तांदूळ,ऊडीद,गहू,रवा ई यांसारख्या विविध प्रकारचे पापड तयार करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत.सध्या सुरू असलेल्या या लाँकडाऊन मध्ये आजवर ज्या पद्धतीने कामे झाली नाहीत,त्यापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात पापड व दाळी बनविण्यात आल्याने घराघरांत रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी सगळीकडे संचारबंदी असल्याने कोणीचं पाहुणे व नागरिक येताना दिसत नाही. व त्याचंबरोबर जो काही भाजीपाला लागणार आहे, तो शेतकरी आपल्या शेतातुन आणत असल्याने ग्रामीण भागात लाँकडाऊन तट धरत असल्याचे दिसुन येते.
एकंदरीत पाहता दरवर्षी प्रमाणे सद्यस्थितीत सगळीकडे शेतीची मशागतीची कामे या महिन्यात मोठ्या प्रमाणात सूरू होताना दिसुन येतात.परंतु याऊलट मशागत ही दिवसेंदिवस विज्ञान व तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी ट्ँक्टरद्वारे करीत आहे.त्यामुळे घरातील महिला वर्ग यांना मोकळा वेळ घालविण्यासाठी अधिकाधिक ऊत्कष्ठ व विविध प्रकारच्या लिज्जत पापड,शेवया व दाळी तयार करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.....
चौकट......कोरोनाच्या वाढत्या आजारामुळे कोणताही ताण नसल्याने सध्या आम्ही विनाकारण आरामापेक्षा बाजरी,शाबुदाणा, तांदूळ,ऊडीद,गहु,रवा,बटाटा चिप्स व त्याचबरोबर तुर,मुग,ऊडीद,चना अशाप्रकारे विविध प्रकारचे पापड व दाळी तयार करण्यात व्यस्त आहोत..........
ग्रहणी मनिषा राठोड पोहरेगांवकर