व्हिसीद्वारे पालकमंत्री, खा.सातवांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

व्हिसीद्वारे पालकमंत्री, खा.सातवांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद


गरजुच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन


हिंगोली - कोरोना साथीचा संसर्गजन्य आजार देशभरातील जनता संकटात सापडली असतांना जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी गरजवतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड व खासदार राजीव सातव यांनी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे आयोजित काँग्रेसच्या आढावा बैठकीत सांगितले.


हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी काँग्रेस पदाधिकार्यांकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत या संदर्भात आज जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड व खासदार राजीव सातव यांनी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे आढावा घेतला या व्हिसीच्या माध्यमातून  माजी आमदार संतोष टारफे,जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, प्रदेश सचिव अब्दुल हाफीज,जक्की कुरेशी,तालुकाध्यक्ष शामराव जगताप, धनजंय पाटील, बापुराव बांगर, अजगर पटेल, शंकर करहाळे, रमेश जाधव, जिल्हा बॅकेचे संचालक बाबा नाईक, जिल्‍हा परिषदेतील गटनेते दिलीप देसाई, न.प.गटनेते शेख नेहाल, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ यांच्यासह जि.प,पं.स.व.नगरसेवक आणि जिल्ह्यातील युवक काँग्रेस.एनएसयुआय आदी सेलच्या प्रमुख  पदाधिकार्यांशी संवाद साधला. 


दिल्ली येथून खासदार राजीव सातव यांनी सर्व पदधिकारी व कार्यकर्त्यांशी व्हिसीद्वारे संवाद साधला़ यावेळी पदाधिकार्यांनी रेशन कार्डला आधार लिंकींग झाले नसल्याने अनेक लाभार्थी वंचीत राहत असल्याचे सांगीतले. तसेच शेतकऱ्यांच्या  शेतमाल विक्रीसाठी लॉकडाऊनमुळे अडचणी येत असून माल विक्रीसाठी आठवड्यात एक दिवस द्यावा, ग्रामीण भागात आरोग्य सुवीधाबाबत अडचणी मांडल्या तसेच ग्रामीण भागात जिवनावश्यक वस्तु चढ्यादराने विकल्या जात असल्याचे सांगितले.      
यांनतर जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी संवाद साधत सांगितले की कार्यकर्त्यांनी आप आपल्या भागातील सर्वसामान्य लोकांना होणाऱ्या अडचणी मांडल्या आहेत त्या बाबत संबधितांना योग्य सूचना करण्यात येईल लॉकडाउन असे पर्यंत  पक्षातील पदाधिकार्यांनी देखील आपल्या जमेल त्या पध्दतीने अडचणीत सापडलेल्या जनतेला मदत करावी. यासंदर्भात पक्षाच्या पदधिकार्यांकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी गरजवतांना धान्य वाटप व भोजन वितरीत केले जात आहे. असेच उपक्रम राबवित पदाधिकार्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी असे सांगितले.


कोरोना संदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एक व्हॉटसअप ग्रुप करुन गरजवतांना केल्या जात असलेल्या मदतीसाठी समन्वय साधण्याचे नियोजन करावे आणि काही अडचण आल्यास आमच्याकडे किंवा जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांक 02456- 222560 वर आपल्या अडचणी मांडाव्यात असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड व खासदार राजीव सातव यांनी केले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा