आरबीआयने नि‍श्चत केलेल्या वेळापत्रकानुसार आजपासून बँकाचे कामकाज सुरु राहणार

आरबीआयने नि‍श्चत केलेल्या वेळापत्रकानुसार


आजपासून बँकाचे कामकाज सुरु राहणार


वस्तू, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना आजपासुन लॉकडाऊनमधुन सुट


हिंगोली, दि.19: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्व बॅंकाचे व्यवहार आरबीआय ने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार दि. 20 एप्रिल, 2020 पासून खातेदारांसाठी सकाळी 10.00 ते दूपारी 3.00 वाजेपर्यंत अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्थिक व्यवहार करता येणार आहे.


सर्व बँकांनी कामाची सुरुवात करण्यापूर्वी संपुर्ण जागेचे सेनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. गर्दी टाळण्यासाठी  एक ते दोन मिटर अंतरावर गोल /चौकोन आखण्यात यावेत. बँकेत आलेले खातेदार आखलेल्या गोल / चौकोना मध्येच उभे राहतील याचे नियोजन करावे. खातेदाराना टोकन देण्यात यावेत, व  टोकन नुसारच व्यवहार करावेत. टोकननुसार नंबर आल्याची खातेदारांना माहिती  होण्याकरीता  Public announcement System बसविण्यात यावी. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रिकामे जागेत मंडप / शामीयाना उभारून तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. खातेदार, सुरक्षा रक्षक, बँक कर्मचारी व अधिकारी यांचे सुरक्षेसाठी मास्क व सॅनीटायझराचा वापर करणेबाबत सर्व संबंधितांना सांगावे व त्याचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. एकाच वेळी बॅंकेमध्ये  5 पेक्षा जास्त व्यक्तीस प्रवेश देवू नये. दररोज कामावर येणाऱ्या अधिकारी /कर्मचाऱ्याची तसेच खातेदारांची तपासणी थर्मल गनच्या सहाय्याने करण्यात यावी. परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची व हात  धुण्याची व्यवस्था व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील यांची ही दक्षता घ्यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या अंतराच्या परीसीमांचे तंतोतंत पालन करुन बॅंकेमध्ये व बॅंकेच्या परीसरामध्ये सामाजीक अंतराचे (Social Distance) पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावावेत. 


या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहिता (1860 चा 45) यांच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र असलेल्या अपराध केला आहे असे मानन्यात येईल.  जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


****


 


वस्तू, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना आजपासुन लॉकडाऊनमधुन सुट


 


हिंगोली,दि.19: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश देण्यात आले आहे.


            राज्य शासनाने लाकडाऊन संदर्भात नवीन सर्व समावेशक अधिसुचना जारी केली असुन या अतिरिक्त औद्योगिक घटकासह शेती विषयक बाबी बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सुट देण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टसींगच्या नियमाचे पालन करुन मनरेगा अंतर्गत कामे करण्याच्या समावेश या अधिसुचनेत करण्यात आला आहे. तसेच राज्य शासकीय कार्यालयामध्ये 10 टक्के अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच जनतेच्या अडचणी जाणुन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दि. 20 एप्रील, 2020 पासुन काही सेवाना लॉकडाऊन मधुन सुट दिली असुन यामध्ये खालील सेवांचा समावेश आहे.


सर्व प्रकारचे वस्तु, माल, घेवुन जाणारे ट्रक तसेच इतर वाहने यांना दोन चालक व एक मदतनीस यांच्यासह प्रवास करण्याची परवानगी असेल, परंतु वाहन चालक यांच्याकडे वैध वाहन परवाना आवश्यक आहे. तसेच माल वस्तुंची पोहच केल्यानंतर रिकामा ट्रक / वाहन परत घेवुन जाण्यास परवानगी असेल. ट्रक दुरुस्तीची दुकाने सुरु ठेवता येतील परंतु केंद्र आणि राज्य शासनाने सोशल डिस्टंसिंगचे घालुन दिलेले नियम पाळणे आवश्यक असेल.


या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहिता (1860 चा 45) यांच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र असलेल्या अपराध केला आहे असे मानन्यात येईल.  जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


****


 


लॉकडाऊनमधुन मनरेगा अंतर्गत येणा-या कामांना आजपासून सुट


 


हिंगोली,दि.19: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश देण्यात आले आहे.


            राज्य शासनाने लॉकडाऊन संदर्भात नवीन सर्व समावेशक अधिसूचना जारी केल्या असुन, या अतिरिक्त औद्योगिक घटकासह शेती विषयक बाबी बांधकाम क्षेत्र आदीना अधिक सुट देण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टंसींग नियमाचे पालन करुन मनरेगा अंतर्गत कामे करण्याचा समावेश या अधिसुचनेत करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मनरेगा अंतर्गत कामांना लॉकडाऊन च्या काळात सुट देण्यात आली असून त्यामध्ये सिंचन अणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे असे सुचीत केले आहे. त्यानुसार सदरची कामे सुरु करुन काम करते वेळेस सोशल डिस्टींग (सामाजिक अंतराच्या) नियमांचे पालन करुन तसेच मजुरांनी चेह-यावर मास्कचा वापर करुन मनरेगाची कामे करत येणार आहे. सदरील कामे खालील अटी व शर्तीच्या आधारे सुरु करता येतील


कामावर आलेल्या कामगारांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नांव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक., कामगारांनी नेहमीच नाक आणी तोंड माक्सने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक राहणार आहे. कामावर आलेले कामगार यांच्यामध्ये किमान एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता घेवून त्यांच्यासाठी हात धुण्यासाठी सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करुन द्यावेत करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून कामगारांची ने-आण करण्यास मनाई असेल. दररोज कामावर येणा-या कर्मचारी/कामगाराची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करावी. मनरेगा अधिकारी/कर्मचारी /कामगारासाठी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात यावेत. कामाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील यांची ही दक्षता घ्यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन कार्यालयामध्ये व कार्यालयाच्या परीसरामध्ये सामाजीक अंतराचे (Social Distance) पालन करावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावावेत. 


या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहिता (1860 चा 45) यांच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र असलेल्या अपराध केला आहे असे मानन्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


****


                 


आजपासून वृत्तपत्रे वितरणास बंदी


 


हिंगोली,दि.19: राज्य शासनाने करोना विषाणुचा (कोवीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 एप्रिल, 2020 पासुन लागु करुन खंड 1, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी यांना (कोवीड-19) नियंत्रण आणण्याठी व त्यांच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपायोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणुन घोषित करण्यात आलेले आहेत.


            राज्य शासनाने आदेश काढून वृत्तपत्र व नियतकालीके यांचे घरोघरी वितरण करण्यास प्रतिबंधीत केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली मधील तरतुदीनुसार तसेच राज्य शासनाच्या सुधारीत अधिसुचनेनुसार हिंगोली जिल्ह्यातील वृत्तपत्र व नियतकालीके यांचे घरोघरी दि. 20 एप्रिल, 2020 पासुन वितरण करण्यास बंदी करण्यात आली आहे.


            या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


**** 


 


शासकीय-निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था


कार्यालयामध्ये आजपासून दहा टक्के उपस्थिती


 


        हिंगोली,दि.19: आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशातंर्गत कोरोना विषाणूचा संसर्ग बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणुन संपुर्ण देशभरात दि. 25 मार्च, ते दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संपुर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागु करुन सिमाबंदी करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाच्या कार्यालयीन आस्थापनांनी फक्त 5% कर्मचारी यांना रोटेशन पध्दतीने दैनंदीन कामकाज पार पाडण्यासाठी कार्यालयामध्ये बोला‍विण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


            परंतू कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत वाढ करुन कांही आस्थापनांना दि. 20 एप्रिल, 2020 पासून शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्यालयांना पुढील अटी व शर्तीच्या आधीन राहुन कामकाज सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खालील अटी व शर्ती, राज्य शासनाच्या वेळोवेळी अद्यावत मार्गदर्शक सूचना व नियमांचे काटेकोर पालन करुन  आजपासून कार्यालये सुरु करण्यासाठी आदेश निर्गमीत केले आहेत.


यामध्ये पोलीस, होमगार्ड, नागरी सुरक्षा, अग्नीशमन, अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह आणि नगरपरिषदा/नगरपंचायती/स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींच्या सेवा कोणत्याही प्रतिबंधा शिवाय शासनाच्या सुरक्षीततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करुन सुरु ठेवता येतील. तसेच सर्व राज्य शासनाचे विभागांनी फक्त 10 टक्के कर्मचाऱ्यांना रोटेशन पध्दतीने कामावर येण्यासाठी उपस्थिती अनिवार्य करुन, त्यांच्या स्तरावरुन आदेश निर्गमीत करुन कार्यालयीन कामकाज लोकांची गैरसोय होवू नये या दृष्टीने सुरु करावीत. तसेच कर्मचारी वर्गाची सेवा 10 टक्के पेक्षा अधिक करण्याचे अधिकार संबंधित कार्यालयाच्या कामकाजाचा भार लक्षात घेऊन संबंधीत कार्यालय प्रमुखांना असतील. कार्यालय प्रमुखांनी दि. 20 एप्रिल, 2020 पासुन कार्यालयाची सुरुवात करतांना संपुर्ण कार्यालयाचे सॅनिटायजेशन करुनच सुरुवात करावी. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अधिकारी/कर्मचारी/अभ्यागतांसाठी सॅनिटायझरची सोय उपलब्ध करुन द्यावी. व प्रत्येक अधिकारी/कर्मचारी व अभ्यागंतांनी संपुर्ण वेळ मास्कचा आवश्य वापर करावा. शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन कार्यालयामध्ये व कार्यालयाच्या परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावण्यात यावे. कार्याल्याच्या परिसरामध्ये अधिकारी/कर्मचारी/अभ्यागतांच्या पिण्याच्या पाण्याची व हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी व पाणी  उपलब्ध राहील याची स्वत: कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी. दररोज कार्यालयामध्ये येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी/अभ्यागंतांची तपासणी थर्मल गनच्या सहाय्याने करण्यात यावी. यासाठी आपल्या कार्यालयाच्या निधीमधुन  थर्मल गन उपलब्ध करुन घ्यावी किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी नोंदवावी.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा