जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाण पत्राशिवाय बाहेर जिल्ह्यात नो एंट्री
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाण पत्राशिवाय बाहेर जिल्ह्यात नो एंट्री
केवळ वैद्यकीय कारणासाठी काढले आदेश, तीनच व्यक्तींना जाता येणार
वसमत - जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संचारबंदी कायदा लागू असल्याने बाहेर वैद्यकीय कारणासाठी जावयाचे असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाण पत्राशिवाय जाता येणार नाही .असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले असून केवळ अटी व शर्थीच्या नियमानुसार वाहनचालक व इतर दोघांना दिलेल्या ठिकानाशिवाय इतरत्र जाता येणार नाही.
राज्य शासनाने कारोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथिचा रोग प्रतिबंधात्मक कायदा - 1897 १३मार्च पासुन जिल्ह्यात लागु केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जयवंशी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात (कोव्हीड-19) नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपयोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
देशांतर्गत , राज्याअंतर्गंत , जिल्हयातंर्गंत नागरीक विविध कारणास्तव प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आल्यावरुन संपुर्ण जिल्हयात जमावबंदी आदेश लागु करण्यात आला आहे. परिस्थिती सद्यस्थिती हाताळण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना वसमत उपविभागाच्या क्षेत्रात नियुक्त करण्यात आले असुन फक्त वैद्यकीय कारणास्तव जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या प्रमाणपत्रासह नागरीकांना हिंगोली जिल्हयातुन इतर जिल्हयात जाण्या-येण्याची परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ज्या अर्जदारांना वैद्यकीय कारणास्तव परवानगी हवी असेल त्यांनी परवानगीचा अर्ज त्यांना पाहिजे असलेल्या परवानगीच्या तारखेच्या २४ तास आगोदर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये अर्ज जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे प्रमाणपत्रासह टाकावा. अशा अर्जदारांना २४ तासाच्या नंतर लगेच अर्जाची व कागदपत्राची पडताळणी करुन खरोखर गरजू असलेल्या अर्जदारांनाच परवानगी देण्यात येईल. सदरील परवानगी ही फक्त तीन व्यक्तीच्या मर्यादेपर्यंत खालील अटीच्या अधिन राहुन देण्यात येईल. यामध्ये रुग्ण, नातेवाईक, वाहनचालक
यांचा समावेश राहील.
वैद्यकीय सेवा घेवुन परत आल्यानंतर उपरोक्त सर्व व्यक्तींना वाहन चालकासह शासकीय विलगीकरण कक्षात दाखल होण्याच्या अटीवर बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.उपरोक्त परवानगी दिलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत इतर ठिकाणी जाता येणार नाही.वाहनामध्ये व इतर ठिकाणी संबधिताने भारत सरकारच्या आदेशानुसार सामाजिक अंतर राखले पाहिजे.परवानगी दिलेले काम झाल्यानंतर तात्काळ परतीच्या प्रवासाला सुरवात करावी कोणत्याही परिस्थितीत सदर शहरात थांबता येणार नाही.संबधिताने नेहमिच नाक आणि तोंड मास्कणे पुर्णपणे झाकुण ठेवणे बंधनकारक आहे.संबधिताने उपरोक्त सर्व अटीचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा नुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.