कोरोना योध्दांना दररोज पुरविला जातोय नास्ता हिंगोली अर्बन ट्रस्टचा उपक्रम
कोरोना योध्दांना दररोज पुरविला जातोय नास्ता
हिंगोली अर्बन ट्रस्टचा उपक्रम
हिंगोली - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने यासाठी शहरात कर्तव्यावर काम करणारे पोलिस कर्मचारी, जवान, आरोग्य कर्मचारी यांना हिंगोली अर्बन ट्रस्टतर्फे दररोज सकाळी नास्ता दिला जात आहे. त्याचे वाटप हे काम करणारे योध्दे जेथे आहेत त्याठिकाणी त्यांना तो दिला जात आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. तसेच बाजारा गर्दी होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने जागोजागी बंदोबस्त लावला आहे. आरोग्य कर्मचारी देखील यात रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांना सकाळ ते सायंकाळ कर्तव्यावरच राहावे लागत असल्याने वेळवेर जेवण नास्ता मिळणे कठीण आहे. यासाठी अन्नदानात नेहमी पुढाकार घेणारे हिंगोली अर्बन ट्रस्टचे जयेश खर्जुले यांनी पुढाकार घेत मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून कोरोना योध्दांसाठी जागेवरच नास्त्याची व्यवस्था केली आहे.
हिंगोली अर्बन ट्रस्टमधील कार्यकर्ते यासाठी पुढाकार घेत आहेत. दररोज दिल्या जाणाऱ्या नास्त्यात पोहे, उपमा, मटकी असा वेगवेगळा नास्ता कर्तव्यावर असलेल्या या कर्मचाऱ्यांना दिला जात आहे. लॉकडाऊन संपेपर्यत तो सुरूच ठेवला जाणार असल्याचे हिंगोली अर्बन ट्रस्टचे अध्यक्ष जयेश खर्जुले यांनी सांगितले. दरम्यान, श्री. खर्जुले हे विविध मंदिरात वर्षभर अन्नदानाचे वाटप करतात यासह शेगाव ते पंढरपुर जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या पालखी सोळ्यातील सहभागीना दरवर्षी डिग्रसपाटी येथे नास्त्याची व्यवस्था करतात हा अनेक वर्षापासून त्यांचा उपक्रम सुरू आहे. यासह त्यांच्या ट्रस्टतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळेत देखील रोटी बँकेचा उपक्रम राबविला जातो यात प्रत्येक विद्यार्थी त्याच्या टिफीनमध्ये एक पोळी अधिक आणतो त्या पोळ्या जमा करून दररोज गरजुपर्यत पोहचविल्या जातात असे उपक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असतात सध्या कोरोनाच्या संकटात देखील कर्तव्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील दररोज नास्ता पुरविला जात आहे.