तलावात बुडून दोन सख्या भावाचा दुर्दैवी मृत्यू
तलावात बुडून दोन सख्या भावाचा दुर्दैवी मृत्यू
हट्टा पोलिस घटनास्थळी दाखल
औंढा नागनाथ - तालुक्यातील नागेशवाडी येथे दोन सख्या भावाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी नऊ वाजता घडली असून घटनास्थळी हट्टा पोलिस दाखल झाले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, औंढा तालुक्यातील
नागेशवाडी येथील गणेश नाईक हे बऱ्याच दिवसापासुन आपल्या कुटुंबाना घेवुन शेतातच राहतात.त्यांची शेती तळ्याच्या काठावर असून बाजुलाच आखाडा आहे. येथे ते राहतात गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या घरातील कुटूंबीय कपडे धुण्यासाठी तलावावर गेले असता त्याची दोन मुले सर्जेराव व धृपत हे पोहण्यासाठी तलावात उतरले व त्यानंतर या मुलांना तलावाच्या बाहेर येता आले नाही तलावात बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर आरडाओरडा झाल्याने बाजुच्या शेतामधील लोकांनी तलावाकडे धाव घेतली व या दोन मुलांना तलावातून बाहेर काढले. मयतमध्ये सर्जेराव गणेश नाईक (वय 12), धृपत गणेश नाईक (वय सात) या दोघां सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघांनाही औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे दाखल झाले होते. पुढील प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी या दोघा भावावर त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गणेश नाईक यांना दोन मुलेच होती.त्यामुळे नाईक कुटुंबावर दुःखाचा डोगर कोसळला .या दोघा भावाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नागेशवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
![]() | ReplyReply to allForward |