उदगीर येथील 35 पैकी 32 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह
32 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह
संगम पटवारी :
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत आज उदगीर येथिल 35 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 32 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 3 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आले आहेत. अंबाजोगाई येथून आलेल्या 1 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे व कासारशिरसी येथे मृत झालेल्या व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.