*वसंतनगर तांड्यावर पोलिसांची धाड, 30000 मुद्देमाल,लाखाचा रसायन नष्ट*....
प्रतिनिधी / शरद राठोड
लातुर तालुक्यातील मौजे वसंतनगर तांडा येथे गातेगांव पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकुण 30000 हजार रूपयांचा मुद्देमाल व रसायनमिश्रीत पावडर सहित जवळपास एक लाखाचा ऐवज जागीच नष्ट केला आहे.
मागील कित्येक दिवसांपासून वसंतनगर तांड्यावर हातभट्टी नावाची गावटी दारू राजरोसपणे विकत असल्याची माहिती गातेगांव पोलिसांना मिळाली.याबाबत संबंधित बिट अंमलदार व सहायक पोलीस निरीक्षक यांनी त्या विक्रेत्यास चांगलीचं समज दिली होती.त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या आजारामुळे प्रशासनाकडुन विविध ऊपाययोजना राबविण्यात येत आहेत.त्यामुळे आधीच वाढलेली नागरिकांची जबाबदारी त्यात दारू माफियाचा सर्रास चालणार खेळ यांसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक टिम नेमण्यात आली.या टिमने योग्य वेळ पाहता मागील आठवड्याभरातुन वसंतनगर तांड्यावर धाडी टाकल्या.या धाडीत त्यांना वसंतनगर तांड्यातील घरासमोर,ऊसामध्ये,तुराट्यात विविध ठिकाणी ठेवलेल्या व जमिनीत काही पुरुन ठेवलेल्या पिवळसर रसायन नष्ट करण्यात आले.यामध्ये एकचण 250 लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली.शिवाय त्यासाठी लागणारे साहित्य रसायन,टाकी,असा एकुण एक लाखाचा ऐवज नष्ट करण्यात आला.त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे कलम 65 एफ,ई,सी अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.या अचानक केलेल्या धाडीने तांड्यावरील हातभट्टी वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
यावेळी पोलिस ऊपनिरीक्षक नंदकिशोर कांबळे,पोहेकाँ सिरसाट,पोहेकाँ शिरसे,पोहेकाँ मुळे,पोहेकाँ काळे यांचे कौतुक होत आहे.