उदगीर येथील 30 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह, एकाही रुग्णाची वाढ नाही.
उदगीर येथील 30 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह
लातूर, दि. 27:- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी उदगीर येथील 30, अंबाजोगाई येथील 2 व या संस्थेतील 1 व्यक्तींच्या स्वॅबची कोरोना (कोविड19) साठी तपासणी करण्यात आली असून सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. ज्या 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत त्या व्यक्तींचे 48 तासानंतर स्वॅब घेवून पुनर्तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे
आज दुपारी उदगीर येथील 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते या मध्ये वाढ झाली नाही. ही एक सुखद बातमी आहे. या तीन रुग्णावर उपचार केले जात आहेत.