वाहन मालक ऐकत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

वाहन मालक ऐकत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा


 जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


हिंगोली - मागील तीन दिवसानंतर  सोमवारी अत्यावश्यक सेवा सुरू झाल्याने रस्त्यावर पुन्हा वाहनांची गर्दी दिसून आली तर भाजीपाला व किराणा दुकानावर आदेशाचे उल्लंघन करीत नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली .यावेळी विश्रामगृहा शेजारील  रस्त्यावर तीनचाकी वाहने, दुचाकी वाहनांची गर्दी खुद्द जिल्हाधिकारी
 जयवंशी यांना दिसून आल्याने त्यांनी काही वाहने जप्त करीत वाहन मालक यापुढे ऐकत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना दिले .


जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.त्यामुळे सोमवारी पुन्हा दहा ते एक यावेळेत किराणा दुकान, भाजीपाला दुकाने उघडल्याने नागरिकांनी साहित्य खरेदी साठी चक्क वाहने आणून रस्त्यावर लावल्याने पुन्हा सर्व ठिकाणी गर्दी दिसून आली. एकीकडे जिल्हा प्रशासन गर्दीवर नियंत्रण ठेऊन कोरोना वर कसा विजय मिळवायचा यावर प्रयत्न करीत असून काही टवाळखोर नागरिक क्षुल्लक कारण पुढे करीत विनाकारण बाजारात फिरत आहेत.


१४ एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश काढले आहेत. किराणा, भाजीपाला खरेदी करताना रस्त्यावर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने आणू नयेत, असे सांगून देखील नागरिक ऐकत नाहीत .सोमवारी तीन दिवसानंतर दुकाने उघडल्याने बाजारात गोंधळ उडाला होता. यावेळी खुद्द जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाजारपेठेत चक्क रस्त्यावर उतरून पाहिले असताना वाहने अस्तव्यस्त लावल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी  स्वतः वाहनांची तपासणी करीत शेकडो वाहने जप्त करीत चाव्या पोलिसांकडे सुपूर्त केल्या. आता यापुढे वाहनचालक, मालक ऐकत नसतील तर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल
 चोरमारे ,उपविभागीय पोलीस अधिकारी वैन्जने ,रामदास पाटील आदींची उपस्थिती होती.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा