उदगीरच्या ३९ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
उदगीरच्या ३९ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
तालुक्यातील वीस गावच्या ग्रामपंचायतीमधील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या अनुसूचित जाती जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गातील एकूण 39 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांची पदे रिक्त करण्यात आली आहेत.
उदगीर (संगम पटवारी ) तालुक्यातील वीस गावच्या ग्रामपंचायतीमधील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या अनुसूचित जाती जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गातील एकूण 39 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांची पदे रिक्त करण्यात आली आहेत. या रिक्त पदांचा अहवाल निवडणूक विभागाला पाठवला असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी ही माहीती दिली आहे.

2018 मध्ये लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी निवडून आल्याच्या सहा महिन्याच्या आत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या व जात पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याची कार्यवाही केली होती. मात्र तत्कालीन शासनाने एक आदेश काढून या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली होती.
मात्र तालुक्यातील वीस गावच्या 39 ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षाची मुदत देऊनही एक वर्षाच्या आत जात पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर केले नाहीत. ही बाब समोर येताच जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी एक वर्षाच्या मुदतीत ज्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाहीत त्यांच्या रिक्त पदांचा अहवाल मागवला होता.गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी या 39 ग्रामपंचायत सदस्यांचा रिक्त पदाचा अहवाल तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.
गावनिहाय ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या सदस्यांची माहिती पुढीलप्रमाणे तोंडार- मनोहर पांचाळ, मन्ना उमरगा- अमोल निलेवाड, बनशेळकी- भारत बाई कांबळे, देवर्जन- सीताबाई कांबळे, बबुबाई कुसळकर, गंगाधर बजगीरे, कुशाबाई जाधव, मोर्तळवाडी- निवृत्ती भुरे, शंभू उमरगा- जयश्री खोडेवाड, संगीता मदने, रमाबाई कांबळे, सिद्धेश्वर मदने, नेत्रगाव- सुशीला सूर्यवंशी, उमाकांत स्वामी, सुकणी- शरद कनकुरे, चिमाचीवडी- सुरेखा गुरमे, रावणगाव- मुनीर कासार, सोनाबाई म्हेत्रे, डिग्रस- निता माने, संगीता यलमटे, तोंडचिर- किशन मुळे, दत्तात्रय जाधव, शेकापूर- सुवलबाई पाटील, नावंदी- माधव गादगे, कांताबाई वाघमारे, सिद्धार्थ मादळे, चोंडी- अनिता नांदुरे, तिवटग्याळ- मरीबा कांबळे, मनीषा पाटील, कैलास तवर, सताळा- नरसिंग सोनकांबळे, बालिका मदने, विठ्ठल नरहरे, भागीरथी मदने, वंदनाबाई बोने, मलकापूर- विजयमाला स्वामी, अरविन करजकर तर मोघा व तोगरी ग्रामपंचायतीचा प्रत्येकी एका सदस्याचे सदस्यत्व रद्द करून रिक्त पदाचा अहवाल पाठवण्यात आले ही माहिती श्री गुट्टे यांनी दिली आहे.
13 महिन्यांपासून जागा रिक्त.....
नगरच्या निवडणूक विभागाने लातूरच्या निवडणूक विभागाला दिलेल्या अहवालात या वीस गावातील 29 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व 23 जानेवारी 2019 रोजी रिक्त झाल्याचा अहवाल दिला आहे. मग तेरा महिने या सदस्यांनी केलेल्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे? हे सदस्य कामकाजा सहभागी असतील तर काय? असा प्रश्न आहे.