परराज्यातून आलेल्या बेघरांना दिले कम्युनिटी किचनमधून अन्नधान्य


परभणीत आनंद भरोसे यांचा पुढाकार, गंगाखेडातही मुरकटेचे दातृत्व
परभणी,दि.28(प्रतिनिधी)ः     गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतून कामासाठी आलेल्या परंतू बेघर असलेल्या 40 कुटूंबांना भाजपच्या कम्युनिटी किचन संकल्पनेतून महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी 20 दिवसांसाठी पुरेल इतके अन्नधान्य शनिवारी(दि.28) वाटप केले.गंगाखेडमध्येही संतोष मुरकुटे हे देखील पालामध्ये राहणा-या 150 कुटुंबांच्या मदतीसाठी धावून गेले.
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पालात राहणा-या या मजूरांना गहू, तांदूळ, तेल, मसाला, साबण आदी साहित्याचे वाटप केले. यावेळी मनपाच्या गटनेत्या मंगल मुद्गलकर, संजय शेळके, माणिक शिंदे, विशाल बोबडे, कोडिंबा कुंभारे, शेषराव खंदारे, धनंजय जाधव, अशोक पारवे आदी उपस्थित होते. भाजपने देशपातळीवर लॉकडाऊनमध्ये फटका बसणा-या वर्गाच्या जेवणाचा प्रश्‍न मिटविण्यासाठी कम्युनिटी किचनचे जाळे उभारले असून या अतंर्गत भाजपच्या येथील पदाधिका-यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.
गंगाखेडमध्ये मुरकुटेंनी केली 150 कुटुंबांना मदत
विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार व गेल्या काही वर्षात आपल्या सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे संतोष मुरकुटे हे देखील शनिवारी पालात राहणा-या कष्टक-यांच्या मदतीसाठी धावून गेले. गंगाखेड शहराजवळील दत्त मंदिर परिसरात भटकंती करून उपजिविका करणारी 150 कुटुंबे पालात वास्तव्यास आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या जेवणाचा प्रश्‍न मार्गी लागावा यासाठी श्री मुरकुटे यांनी त्यांना 15 दिवसांचे अन्नधान्य वाटप केले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलिस उपअधीक्षक बलराज लांजिले, तहसीलदार स्वरूप कंकाळ, मुख्याधिकारी नानासाहेब कामटे, नगरसेवक बाळासाहेब राखे, गोविंद यादव आदी उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे अन्नदान
जिल्हा वृत्तपत्र विक्रेत्यांनीही निराधार गरजूंना अन्नदान्नाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे गोरगरीब अन्नापासून वंचित राहू नये, त्यांची हेळसांड होवू नये, यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी खिचडी तयार करून त्यांचे वाटप शहरातील विविध ठिकाणी केले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा