गुळ उत्पादक शेतक-याची  गु-हाळाकडे पाठ

गुळ उत्पादक शेतक-याची 
गु-हाळाकडे पाठ


दिवसेंदिवस वाढणार्‍या ऊसाचे प्रमाण...      वाढलेली मजुरी .. गुळाचा ढासळलेला दर... आणि मिळणार्‍या उत्पन्नातील तफावत यांचा न जुळणारा मेळ यासह अन्य काही कारणास्तव  रोहिणा, कबनसांगवी,उजळंब,आटोळा,बावलगाव,कुंभेवाडी,आंबेवाडी  परिसरातील  गुर्‍हाळ घरांना अखेरची घरघर लागल्याचे दिसुन येत आहे.या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुर्‍हाळ असायचे सध्यस्थितीत कांही मोजक्याच ठिकानी गुर्‍हाळ घरे चालू आहेत.या क्षेत्रात ऊसाचे उत्पन्न घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. ऊस ही भरपूर आहे. पण गु-हाळाची कामे करणारी कामगाराची मजुरीही वाढली आहे.पण गुळाचा दर मात्र शेतक-याना परवडणारा नाही.कारण ऊस तोडणी,वाहातुक,गुळ तयार करणे आणि ते बाजर पेटे पर्यंतची गुळाची वाटचाल पहाता येणा-या  सर्व खर्चाचा विचार केला तर शेतक-याच्या पदरी खर्च वजा जाता वर्षा काटी फक्त चाळीस ते पंचेचाळीस टक्के उत्पन्न निघत आहे या मुळे गु-हाळ परवडनासे झाले आहे. शेतक-याच्या उत्पन्नातील तफावत पाहीली तर सध्याच्यास्थित गुळाचे दर पाहाता एक टन गुळमागे शेतक-याना एक हाजार रूपये मिळणेही अवघड झाले.मशागत,ऊस लागवड,पाणी,विजेचा प्रश्नन,खताचा खर्च,तोडणी,वाहतुक खर्च पहाता टनामागे दोन हाजाराहुन ही आधिक खर्च येतो.आशा स्थितीत गुळाचे दर ढासाळल्याने केवळ गुळासाठी केली जाणारी ऊस शेती न परवडणारी झाली आहे.


मजुरांचाही ताळमेळ आणि शेतीचा आगोदरच्या खर्च गुळाचा दर यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे गुळ धंदा अक्षरशः बंद करावा लागला आहे. 


फोटो मध्ये मजुरा अभावी बंद पडलेला    गुळ उद्योग.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा