औंढा नागनाथ येथील बाजारात खरेदीसाठी उडाली झुबंड
औंढा नागनाथ येथील बाजारात खरेदीसाठी उडाली झुबंड
औंढा नागनाथ - कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगात थैमान घातले आहे. आता या विषाणूचा प्रभाव देशातील विविध राज्यात वाढत आहे. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी देशासह राज्यांमध्ये 14 एप्रिल पर्यंत लाँकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही येथे भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुबंड उडाली होती.
कोरोना विषाणूच्या व्हायरसने जगभरातील हजारो नागरिकांचा बळी घेण्याचे काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गाने देशातील विविध राज्यात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सह जिल्ह्यात तालुक्यात शासनाच्यावतीने 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 14 एप्रिल पर्यंत देशभरात लाँकडाउन केले आहे. संचारबंदी लागू असल्याने गर्दी टाळण्यासाठी औंढा नागनाथ येथील डॉ. हेडगेवार चौक ते नगरपंचायत या रोडवर विक्रीसाठी विक्रेत्यांनी भाजीपाला आणला होता.
यावेळी भाजीपाला विक्रेत्यांने हि मास्क लावलेले नव्हते तसेच सँनिटायझरचा वापर ही करण्यात येत नसल्याचे दिसून आले .भाजीपाला खरेदी आणि विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांसह नागरिकाची भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सोशल डिस्टंन्सिंगचा असा फज्जा उडाला आहे.तसेच लाँकडाउनच्या काळात मागील पाच दिवसांपासून एकिकडे औंढा पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पडताना दिसून येत आहे .तसेच नागरिक नियम पाळत नसल्याने प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्यात यावे, अन्यथा औंढा शहरात संचारबंदी असतानाही कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जे नागरिक नियम पाळत नसतील त्यांच्यावर स्थानिक प्रशासन यावर काय कारवाई करणार आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अनेक जण नियमाकडे दुर्लक्ष करत आहेत.
--------------------
अत्यावश्यक खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या सुज्ञ व सुजाण नागरिकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या संरक्षणासाठी स्वयंस्फूर्तीने सोशल डिस्टंन्सिंग ठेवावे. दिलेल्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करून घ्यावे. शहरातील नागरीकांनी सहकार्य करावे.तसेच भाजी विक्रेत्यांनी गर्दी टाळण्यासाठी दिलेल्या सूचनेचे पालन करून मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
निशिकांत प्रचंडराव
मुख्याधिकारी