ग्रामपंचायत निवडणूकीत नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
नामनिर्देशनपत्रात जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक
राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
हिंगोली - ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आल्याचा राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून सर्व जिल्हाधिकारी यांना या बाबत निवडणूक आयोगाने गुरूवारी (ता.५) एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
ग्रामविकास विभाग शासन अध्यादेशानुसान सप्टेंबर २०१९
अन्वये राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कायचक्रर्मानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूक कार्यक्रमासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी जुन ता.२०, किंवा त्यापुवीचा असेल त्याबाबतीत नामनिदेशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासासाठी
पडताळणी समीतीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किंवा पडताळणी समीतीकडे अर्ज केलाअसल्याबाबतचा
अन्य कोणताही पुरावा आणी निवडूण आल्याचा तारखेपासून बारा महिण्याच्या आत पडताळणी समितीने
दिलेले वैधता प्रमाणपत्रसादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मूभा उमेदवारांना दिली होती. मात्र या
अध्यादेशाचे अनिनियमात रुपातंर झालेले नाही. तसेच त्यास
मुदतवाढ देण्यासंदभात ग्रामविकास विभागाकडून अद्याप काही कळविण्यात आलेले नाही .
सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम
१०-१अ मधील तरतुदीनुसार राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिदेशनपत्राबरोबर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे
प्रमाणपत्र व पडताळणी समतीने दिलेले वैधता प्रमाणपत्र
सादर करणे अनिवार्य असेल, याची नोंद घ्यावी घ्यावी.
याबाबत सर्व संबधित निवडणूक अधिकारी, निवडणूक
निर्णय अधिकारी व संबधीत उमेदवार यांना तात्काळ अवगत करावे. तसेच याबाबत स्थानिक पातळीवर सर्वच
प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिध्दी देण्याची दक्षता घ्यावी असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.