जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीमा बंद 

जिल्‍ह्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीमा बंद 


हिंगोली -  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी (ता. 23) जिल्‍ह्‍याच्या सीमाबंद करण्याचे आदेश संबधित यंत्रणेला दिले आहेत. 


जिल्‍ह्यात कोरोना आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्‍ह्‍यातील नागरीक बाहेर जिल्‍ह्‍यात प्रवास 
करीत आहेत. तसेच बाहेर जिल्‍ह्‍यातील नागरीक देखील 
हिंगोली जिल्‍ह्‍यात येत आहेत. त्‍याअनुषंगाने बाहेर जिल्‍ह्‍यातून येणाऱ्या नागरीक प्रवाशी यांच्या मार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही त्‍यामुळे जिल्‍ह्‍यातील नागरीकांच्या आरोग्याचा सुरक्षेच्या 
दृष्टीने प्रतिबंधात्‍मक उपाय योजना म्‍हणून जिल्‍हा प्रशासनाने सीमा बंद करण्याचे आदेश संबधीत विभागाला दिले आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा