औंढ्यातील ग्रामीण रुग्णालय सलाईनवर
औंढ्यातील ग्रामीण रुग्णालय सलाईनवर
औषधीचा तुटवडा ,रुग्णांची गैरसोय
औंढा - येथील ग्रामीण रुग्णालय सला इनवर असून औषधांचाही तुटवडा झाला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कुठलेही औषध मिळत नसल्यामुळे रुग्णाची गैरसोय होत असल्याची तक्रार नगरसेवकाने केली आहे.
ग्रामीण रुग्णालयाचा कारभार अलबेल झाला असून ,सिस्टरच डॉक्टर झाले असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. यावर मात्र वैद्यकीय अधिक्षक यांचा कुठलाही वचक नसल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक हे पूर्णवेळ औंढा रुग्णालयातच असावे अशी मागणी केली आहे .औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र असून येथे देशातील नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त श्री नागनाथाच्या दर्शनासाठी येत असतात. औंढा शहरातील व परिसरातील येणाऱ्या भक्तांचे व नागरिकांचे उपचार करण्यासाठी शहरात एकमेव ग्रामीण रुग्णालय असून सदरील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रेमानंद निखाडे हे आठ दिवसही औंढा ग्रामीण रुग्णालयात हजर रहात नाहीत. यावरही त्यांना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. यामुळे औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या जवळचे असलेले हिंगोली जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पदभार दिलेले असून हेच कारभार जास्त पहात आहेत व त्यांच्या मर्जीतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना सहकार्य करतात. त्यामुळे सर्व जिल्हाभरात आरोग्य सेवाही विस्कळीत झालेली आहे. तसेच डॉक्टर प्रेमानंद निखाडे वैद्यकीय अधीक्षक यांना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाचा अतिरिक्त पदभार तात्काळ कमी करून त्यांनी पूर्णवेळ औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करावे व ग्रामीण रुग्णालय येथे नेहमी हजर राहावे असे निवेदन औंढा नागनाथ येथील नगरसेवक शकील अहमद जलील अहमद यांनी जिल्हा शल्यचिकित्सक हिंगोली व औंढा नागनाथ तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले आहे. तरी सदरील निवेदनाची तात्काळ दखल घेऊन वैद्यकीय अधीक्षक डाँ प्रेमानंद निखाडे यांचा पूर्णवेळ औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात देण्यात यावा ,अन्यथा येत्या काळामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला .