पोलिसाच्या हाताला झटका देवून पळालेला आरोपी जेरबंद

पोलिसाच्या हाताला झटका देवून पळालेला आरोपी जेरबंद


हट्टा पोलिस ठाण्यातील घटना, 


वसमत -  तालुक्‍यातील हट्टा पोलिस ठाण्यात घरफोटी प्रकरणातील अटक असलेल्या आरोपी रविवारी  सकाळी ४.४० वाजता लघुशंकेसाठी पोलिस घेऊन जात असताना त्‍यानेपोलिसाच्या हाताला झटका देवून पळून गेला त्‍याला स्‍थानिक गुन्हे शाखा व हट्टा पोलिसांनी परभणी जिल्‍ह्‍यातील मानगाव येथील एका शेतात अटक केली. 


या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हट्टा परिसरातील घरफोडी प्रकरणातील इश्चर पवार राहणार बिंबी ता. लोणार जि.बुलढाणा याला स्‍थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्‍याच्या घरून अटक करून हट्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले हा आरोंपी पोलिस कोठडीत आहे. रविवारी सकाळी 4.40 वाजता त्‍याला लघुशंकेसाठी पोलिस घेऊन जात असताना त्‍याने पोलिसाच्या हाताला झटक देवून तो फरार झाला.  त्‍यानंतर पोलिसांनी त्‍याचा शोध सुरू केला यात स्‍थानिक गुन्हे शाखेचे पथक व हट्टा पोलिसांनी त्‍याची शोध मोहिम सुरू केली. 


फरार झालेला आरोपी परभणी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली त्‍यानंतर स्‍थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गजानन मोरे, आकाश सरोटे, राजेश ठाकुर, गणेश लेकुळे, इम्रान कादरी, सचिन शिंदे, बालाजी जाधव, अरविंद गजभार आदीनी पुर्णा नदीपात्राच्या पलीकडील बाजूस परभणी जिल्‍ह्‍यातील मानगाव येथील एका शेतात कापसाच्या पिकात लपून बसल्याचे लपून बसल्याचे नईम कादरी यांना दिसला आरोपी इश्वर याला पोलिस येत असल्याचे लक्षात येतात त्‍याने पळ काढला. 


दरम्‍यान, रनर व फुटबॉल खेळाडू असलेले पोलिस कर्मचारी नईम कादरी यांनी त्‍याचा पाठलाग सुरू केला. तीन किलोमीटर अंतरावर गेल्यावर त्‍याला  कादरी यांनी पकडले. सात ते आठ तास आरोपीचा शोध घेत स्‍थानिक गुन्हे शाखा व  हट्टा पोलिसांनी एकत्र येत बावीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा