जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा
औंढा - शहरात हिंगोली ते औंढा रोडवर एका हॉटेलसमोर विनानंबरच्या एका टॅक्टर चालकाने टॅक्टरवर टेपची गाणी मोठ्या आवाजात लावून नागरिकांना त्रास होईल अशा रितीने वाजवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी एकावर रविवारी (ता.२३) गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा पोलिस ठाण्यातंर्गत शहरातून जाणाऱ्या हिंगोली ते औंढा रस्त्यावर वाशीमकर यांच्या साईनाथ हॉटेलसमोर रविवारी सकाळी दहा वाजता सारंग टोंपे राहणार सुरवाडी ता. औंढा याने त्याच्या ताब्यातील विनानंबरचे टॅक्टरवर टेपची गाणी मोठ्या आवाजात लावून शहरात राहणारे लोकांना त्रास होईल अशा रितीने वाजवून जिल्हाधिकारी संदर्भाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिस कर्मचारी राजकुमार सुर्वे यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास ए. जी. पठाण हे करीत आहेत.