शहरात पालिका प्रशासनातर्फे जंतुनाशकाची फवारणी
शहरात पालिका प्रशासनातर्फे जंतुनाशकाची फवारणी
हिंगोली - शहरातील कोरोनाच्या खबरदारीसाठी विविध भागात नगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (ता.17) जंतुनाशक फवारणी स्वच्छता विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आले आहे.
शहरातील विविध भागात स्वच्छतेचे दृष्टिकोनातून जंतुनाशक पावडर व जंतुनाशक फवारणी करण्यात येत असून विविध भागातील शौचालय, नाल्या तसेच शहरातील प्रमुख ठिकाण अशा सर्व ठिकाणी फवारणी करण्यात येत असून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाने विविध प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणी सुरू केली असून नागरिकांना कोरोना विषाणूच्या संदर्भात जनजागृती सुध्दा करण्यात येत आहे.
पालीका प्रशासनातर्फे शहरात गल्लोगल्ली सकाळी घंटागाडीच्या माध्यमातुन ओला व सुका कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. यावेळी घंटागाडीवर देखील स्पीकरच्या माध्यमातून कोरोना बाबत जनजागृती करून त्या बाबत उपाय सांगण्यात येत आहे. पुर्वी या गाडीवर विविध गिताची धुन आता बंद झाली असून कोरोना विषयी जनजागृती भल्या पहाटेचा नागरीकांच्या कानावर पडत आहे.