अधिव्याख्यात्याना टिच फ्रॉम होमचे निर्देश शासकीय तंत्रनिकेतनचा ऑनलाईन उपक्रम

अधिव्याख्यात्याना टिच फ्रॉम होमचे निर्देश


शासकीय तंत्रनिकेतनचा ऑनलाईन उपक्रम


हिंगोली - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपक्रमाद्वारे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी टीच फ्रॉम होमचे निर्देश दिल्याचे प्रभारी प्राचार्य गोविंद सुडे यांनी सांगितले.


कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात पसरवू नये याची खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, तंत्रनिकेतन विद्यालयाना (ता.३१) मार्च पर्यंत पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार अध्यपकाना (ता.२५) मार्च पर्यंत घरी राहून कामकाज करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरिता शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. रणजित सावंत यांनी त्यांच्या 
अध्यापकासोबत घरी थांबवायचे आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमपूर्ण करून घेण्यासाठी संस्थेतील आधीव्याख्यात्यांना टीच फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत.मॉक, कहून,व्हर्चुअल ई लर्निंग, या अत्याधुनिक शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या सूचना गोविंद सुडे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना व्हॉटसअप ग्रुप, ईमेल, ऑनलाईन पद्धतीने शिकवून अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे.


या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेबसाईट शेअर करून विविध विषयांवर व्हिडीओ लेक्चरर्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. या सोबतच विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, प्रतिपूर्ती काम सुद्धा कामकाज सुरु आहे. या संकल्पनेच्या यशस्वी अंमलबजावणी करिता वर्क फ्रॉम होम, व लर्न फ्रॉम होम या पद्धतीचा अध्यापक वर्ग उपयोग करीत असल्याचे प्रभारी प्राचार्य गोविंद सुडे यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा