जून्या मोंढ्यातील हॉटेलात युवकाचा निर्घृण खून

जून्या मोंढ्यातील हॉटेलात युवकाचा निर्घृण खून



परभणी,दि.16(प्रतिनिधी)ःयेथील मध्यवस्तीतील जुना मोंढा परिसरातील न्यु दिलकश हॉटेलमध्ये एका 32 वर्षीय युवकाचा अज्ञात व्यक्तीने चाकुचे वार करीत शनिवारी(दि.14) सकाळी 11 च्या सुमारास निर्घृण खून केला. पोलिसांनी त्या अज्ञात आरोपीस अवघ्या काही तासाच जेरबंद करून गुन्ह्याची उकल केली.
नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना मोंढ्यात शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास शेख हमीद शेख हुसेन(वय32 रा.मराठवाडा प्लॉट) भागातील युवक दाखल झाला. त्याने हॉटेल मालकास ऑर्डर दिल्यानंतर तो टेबलवर बसला. त्याच क्षणी तोंड्यास रुमाल बांधून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने धारधार चाकूद्वारे शेख हमीद शेख हुसेन यांच्या मांडीवर आणि पोटावर चाकुने सपासप वार केले. त्यास गंभीर जखमी केल्या बरोबर तो आरोपी तेथून फरार झाला.
हॉटेल मालकाने तात्काळ धाव घेवून शेख हमीद शेख हुसेन यास अन्य काही सहका-यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू होण्यापुर्वीच शेख हमीद शेख हुसेन याचा मृत्यू झाला.
या खळबजनक घटनेबाबत नानलपेठ पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाच्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी तातडीने या घटनेतील फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला. लगेच माहिती गोळा करीत दोन पथके तयार करून त्या अज्ञात आरोपीची ओळख पटविण्यासाठी त्यास जेरबंद करण्याकरिता सापळा रचला. नेमलेल्या पथकाने अगदी अल्पवेळात आरोपीच्या मागावर म्हणजे वसमत रस्त्यावर सापळा रचला. अन् विजय बाबासाहेब वाकळे (वय32,रा.मराठवाडा प्लॉट) यास ताब्यात घेतले.
दरम्यान, नानलपेठ पोलिसांनी याप्रकरणात संबंधीत आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नं 138/220 कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती आर.रागसुधा, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे, सखाराम टेकुळे, हनुमंत जक्केवाड, हरीष खुपसे, गणेश कौटकर, राजेश आगाशे, दत्ता गुंगाणे, संतोष सानप, सुनिल राठोड,विशाल वाघमारे आदीनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 31 मार्च पर्यंत शाळा बंद
परभणी,दि.16(प्रतिनिधी)ःकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून राज्य सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे 31 मार्च 2020 अखेरपर्यंत सर्व सरकारी, खासगी शाळा व महाविद्यालय बंद ठेवली जाणार आहेत.
दरम्यान, इयत्ता दहावीच्या व बारावीच्या परीक्षा तसेच विश्‍व विद्यालयाच्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसारच घेण्यात याव्यात, असे निर्देश ही प्रधान सचिवांंनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासून लागू करण्याचा निर्णय जाहीर केला असून खंड दोन, तीन व चार मधील तरतुदीनुसार अधिसूचना सुध्दा निर्गमीत केली आहे. त्याप्रमाणे सर्व नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व खासगी शाळा तसेच महाविद्यालय, आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थपनेवरील शैक्षणीक संस्था 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतू इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसारच घ्याव्यात, असे निर्र्देश प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिले आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा