सेनगाव येथे तालुकास्तरीय प्रशिक्षणास शिक्षकांचा प्रतिसाद
सेनगाव येथे तालुकास्तरीय प्रशिक्षणास शिक्षकांचा प्रतिसाद
सेनगाव - येथील तोष्णीवाल महाविद्यालयात फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत शुक्रवारी (ता.१३) तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणास शिक्षकांचा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य एस. जी.तळणीकर हे होते, तर क्रीडा अधिकारी फुफाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील१२५शिक्षकांना पावर प्रेझेंटेशन द्वारे वयोगट नुसार माहिती देण्यात आली.फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत ६ ते १८ वयोगटातील मुले-मुलींसाठी क्रीडा नैपुण्य असलेल्या खेळाडूंचा शोध घेऊन जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी शाळा स्तरावर विविध चाचण्या कश्या पद्धतीने घ्यावयाच्या आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानुसार पाच ते आठ वयोगटात तीन चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये उंची, वजन, प्लेट टॅपिंग ,तर पाच ते आठ साठी बॅलन्स चाचणी, नऊ ते अठरा वयोगटासाठी वजन,उंची, पन्नास मीटर डॉग रण,६००मीटर रण अँड वॉक, सीट अँड रिच ,पार्सल कलर्स अप, या शारिरीक कासोट्यांचे मूल्यमापन व प्रात्यक्षिक पावर प्रेझेंटेशन द्वारे दाखविण्यात आले. मास्टर ट्रेनर संजय बुमरे, नरेंद्र रायलवार, सुशील इंगोले, क्रीडा संयोजक एस. एस. नाईक, माधव बल्लाळ, हिम्मत शिंदे, यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास तालुक्यातील विविध शाळेचे१२५ शिक्षक सहभागी झाले होते.