इंटरनेटच्या युगात मामाचा गाव परका!
इंटरनेटच्या युगात मामाचा गाव परका!
हत्ता नाईक -
झुक झुक झुक झुक आगिनगाडी पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया बालगीतांचा विसर आता पडलेला आहे .काळाच्या ओघात आणि इंटरनेटच्या जमान्यात मामाचा गाव हरवला असल्याचे चिमुकल्याना दिसत आहे.
काही वर्षांपूर्वी शाळेतील उन्हाळ्याची सुट्टी लागताच बच्चेकंपनी मनात बेत आखत असे,ते मामाच्या गावाला जाऊन धमाल करायची मौज, मज्जा मस्ती खेळ आणि फक्त खेळत मात्र सध्याच्या इंटरनेटच्या युगात मामाचा गाव परका झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याची जागा आता फेसबुक ,व्हाट्सअप, आणि व्हिडिओ थ्रीजी गेमने घेतली आहे .वार्षिक परीक्षा संपली की उन्हाळ्याच्या सुट्टीची छोटे बाल मित्र आतुरतेने वाट पाहात असतात एकेकाळी उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की ग्रामीण व शहरी भागातील मुले मामाच्या गावाला जाण्यासाठी आतुर असायची तिथे गेल्यावर भरपूर खेळ खेळायचे पोहण्यास, शिकायचे तासनतास विहिरीत दुबईचे मोज मस्ती करायची तसेच आजी-आजोबा मामा आपल्या नातवाची भाषेचे कौतुक करायचे मामाही आपल्या लाडक्या भाषेचे सर्व लाड पुरवायचे, त्यामुळे लहान मुले, सर्व नातेवाईकांना ओळखायचे दोन्ही घरचे आजी आजोबा, मामा मामी, काकी काका, आत्या मावशी कुटुंबातील इतर भावंडे या सर्वांचा सहवास लाभायचा, त्यामुळे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती टिकुन होती.
परंतु काळाच्या ओघात बरोबर सध्या नोकरी-व्यवसायानिमित्त गावाकडील मुले शहरात आली आणि तेथेच स्थिरावली प्रत्येकाला करिअर करण्याची घाई झालेली आहे. त्यामुळे शहरात आल्यावर ते शहरवासीय झाले. खेड्याकडे गावाकडे जाण्यासाठी ते नाक मुरडू लागलेली आहेत त्यांचे मूले गावी जायला धजावत नाहीत आजी आजोबाचे प्रेम मिळत नाही त्यांच्याबद्दल आदर उरला नाही .आई-बाबा एेवजी पप्पा मम्मी डॅडी ऑंटी अंकल इंग्रजी भाषेच्या करून लागलेल्या ग्रामीण संस्कृती आणि चेहरा संस्काराचा मुलांना विसर पडू लागला आहे. नातेवाईकाकडे जाणे येणे झाल्यामुळे आई वडील व्यतिरिक्त इतर नातेवाईकांची ओळख करून देण्याची वेळ या मुलावर आलेली आहे.