हिंगोली बाजार समितीला जप्तीची नोटीस देताच केला कराचा भरणा
हिंगोली बाजार समितीला जप्तीची नोटीस देताच केला कराचा भरणा
नऊ लाख ३६ हजाराचा दिला पालिकेला धनादेश
हिंगोली - येथील बाजार समितीकडे इमारतीच्या कराची १८ लाख ७३ हजार ३१८ रुपये थकीत आहेत. याबाबत नगरपालिकेने मंगळवारी (ता.17) जप्तीची नोटीस देत सील ठोकताच बाजार समितीने ९ लाख ३६ हजाराचा धनादेश पालीका प्रशासनाकडे सुपुर्त केल्यानंतर लावलेले सील काढण्यात आले.
बाजार समितीकडे नगरपालिकेच्या करापोटी 18 लाख 73 हजार 318 रुपये येणे बाकी आहेत. या बाबत पालीका प्रशासनाने वेळोवेळी कराचा भरणा करावा त्या संदर्भाचे बील व नोटीस देखील दिली होती. परंतू बाजार समितीने आजपर्यत कराचा भराणा केला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नगपरिषदा, नगरपंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम 1965 चे कलम 152 नुसार रक्कम वसुलीसाठी मंगळवारी बाजार समिती यांच्या कार्यालयास सील लावून मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे नोटीस मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या स्वाक्षरीने देण्यात आली.
तसेच नगरपालिकेचे उपमुख्यधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकिय अधिकारी शाम माळवटकर, डी. पी. शिंदे, व्ही. एच. हेलचल. एम. व्ही. घुगे या पंचासमक्ष नोटीस देवून सील करण्यात आले तसेच करावा भरणा करेपर्यत हे सील कोणी काढू नये अशी सुचना देण्यात आली होती. त्यानंतर तातडीने बाजार समितीने 9 लाख 36 हजाराचा धनादेश पालिका प्रशासनाकडे सुपुर्त केल्याने त्यांचे लावलेले सील काढण्यात आले.