गोरेगावात १५० रुग्णांची मोफत तपासणी
गोरेगावात १५० रुग्णांची मोफत तपासणी
हिंगोली - सध्या सर्वत्र कोरोना संसर्ग विषाणूने थैमान घातल्याने शासकिय यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. मात्र ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्यांना त्यांचे दवाखाने बंद केल्याने अनेकांच्या अडचणी होत आहेत. परंतू गोरेगाव येथील खाजगी वैद्यकिय व्यवसायीक डॉ. दिपक पाटील गोरेगावकर यांनी विविध आजाराचे उपचारासाठी येणाऱ्या दिडशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे.
कोरोना या विषाणू मुळे देशातील सध्याची परिस्थिती व ग्रामीण भागातील जनतेची लहान सहान आजाराने होत असलेली वैद्यकीय गैरसोय लक्षात घेऊन येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिपक पाटील गोरेगावकर यांनी आपले हॉस्पीटल सुरू ठेवले असुन गेल्या २ दिवसात १५० पेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी केली. यामध्ये बरेचसे रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली व काही गरजु लोकांना औषधी देखील देण्यात आली. यानंतर अजुन काही दिवस सध्याची परिस्थिती ठीक होईपर्यंत मोफत आरोग्य सेवा सुरू राहील असे डॉ. दिपक पाटील यांनी सांगीतले.
या कार्याबद्दल डॉ. दिपक यांचे गावातुन कौतुक होत आहे. अशीच जनसेवा येथील डॉ. रवि पाटील गोरेगावकर यांनी केली असुन त्यांनी व गजानन गिरे यांनी स्वखर्चातुन गावात जंतुनाशक धुरफवारणी केली आहे. कै. निवृत्ती पाटील शिक्षण व वैद्यकीय सेवा प्रसारक संस्था गोरेगाव व शिव हॉस्पिटल यांच्या वतीने गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. गावकऱ्यांना कोरोना या महामारी बद्दल जनजागृती करण्यात आली.
यावेळी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीमनवार, तुराफभाई, दिलीप कावरखे, जगन कावरखे, गजानन गिरे, गजानन कावरखे, मोईन पठाण, दौलत भाई, शिकदरभाई, रामा कांबळे, सीताराम कावरखे, शिवाजी पाटील, नंदू रवणे, राजू गायकवाड, सोपान रनंबावले आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाबद्दल सर्वाचे कौतूक होत आहे.