भेसळयुक्त बियाणांचे प्रकरणात अर्थपूर्ण तडजोड विद्यापीठाद्वारे पध्दतशीरपणे घुमजाव

भेसळयुक्त बियाणांचे प्रकरणात अर्थपूर्ण तडजोड
विद्यापीठाद्वारे पध्दतशीरपणे घुमजाव, कृषीमंत्र्याचेही गुळमुळीत धोरण
परभणी,दि.06(प्रतिनिधी)ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने महाबीजसह हजारों शेतक-यांना पुरवठा केलेल्य भेसळयुक्त बियाण्यांच्या प्रकरणात  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी वरिष्ठ अधिका-यांसह संशोधन वगैरे कोणीही जबाबदार नसल्याचा सुर आळवून पीक काढणीच्या वेळी कनिष्ठ कर्मचा-यांनी कबाईड हार्व्हेस्टींग यंत्राचा वापर केलामुळेच  काही बियाणे भेसळयुक्त झाल्याचा दावा केला. राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनीही त्याच गोष्टीची रि ओढून तो प्रकार अवधानाने झाल्याचे नमुद केले. एकंदरीत अर्थपूर्ण तडजोडीच या प्रकरणातील गांभीर्य नष्ट करत असून थातूरमातूर कारवाया करीत  हे प्रकरण पध्दतशीरपणे दडपले जाईल, असे स्पष्ट संकेत आहेत.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसांपुर्वी विधानसभेत परभणी कृषी विद्यापीठातंर्गत भेसळयुक्त बियाणां बाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्याद्वारे विद्यापीठातंर्गत कुलगुरूसह संबंधीत वरिष्ठां विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. विशेषतः विदर्भातील डझनभर आमदारांनी या विषयावरील चर्चेत सहभाग नोंदवून परभणी विद्यापीठाच्या या भ्रष्ट व अनागोंदी कारभारामुळे महाबीजसह हजारों शेतक-यांचे अब्जावधी रुपयाचे नुकसान झाल्याचा आरोप केला. संबंधीता विरूध्द चौकशी करीत गुन्हे दाखल करावेत. तातडीने निलंबन करावे तसेच नुकसानीपोटी नियमाप्रमाणे शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली.
राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याप्रकरणात विद्यापीठाने पीक काढणी करण्याकरिता कबाईड हार्व्हेस्टींग या यंत्राचा वापर केला होता. त्यामुळे महाबीज व शेतक-यांना बियाणे पुरवितांना त्या यंत्रात अगोदरच शिल्लक असलेल्या दुस-या सोयाबीन वाण्याचे बियाणे राहिल्याने भेसळ आढळून आल्याचा खुलासा केला. विद्यापीठास एकत्रीत कापणी न करण्याच्या सूचना देण्यात येतील, एवढीच उत्तर देवून कृषीमंत्री भिसे यांनी या प्रकरणात विद्यापीठाने केलेल्या खुलासाशी रि ओढली परंतूू श्री फडणवीस यांच्यासह अन्य आमदारांनी विद्यापीठाच्या, कृषी मंत्र्याच्या त्या खुलासावर कडाडून हल्ला चढविल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त बियाणांचा पुरवठा होत असताना टीचभर यंत्राद्वारे भेसळ झाल्याचा दावा करणे हास्यास्पद असल्याची टिका केली. या चर्चेत आमदार सर्वश्री भारत भालके, सुनिल प्रभु, रणजीत कांबळे आदींनी सहभाग नोंदविला.
75 लाख रुपये वसुल करणार
फडणवीस यांच्यासह डझनभर आमदारांनी टिकेचे झोड उठविल्यानंतर भुसे यांनी याप्रकरणात नुकसान झालेल्या शेतक-यांना नियमाप्रमाणे 35 टक्के नुकसान भरपाई देण्यात येईल, असे विधानसभेत जाहीर केले. तसेच नुकसान ज्याच्यामुळे झाले त्यांच्याकडून ते 75 लाख रुपये वसुल केले जातील, असे नमुद करीत सोयाबीन बियाणे एमएयुएस 71 आणि 62 यांच्या एकत्रीत करणास जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा केली.
गाव जले हनुमान बाहर भूमिका...
कृषी विद्यापीठातंर्गत भेसळ युक्त बियाणांच्या पुरवठा प्रकरणात कुलगुरू डॉ.ढवण यांच्यासह संशोधन संचालनालयाने सर्वप्रथम कबुली पाठोपाठ घुमजाव भूमिका घेवून उच्च पदस्थ अधिका-यांसह कृषीमंत्री व पाठोपाठ विधानसभेस सुध्दा एका यंत्रात जुन्या राहिलेल्या बियाणामुळे भेसळ झाल्याचा चुकीची व हास्यास्पद दावा करून या प्रकरणात पडदा टाकण्याचा पध्दतशीरपणे प्रयत्न सुरू केला आहे. त्यास उच्चपदस्थ पातळीवरील काही मंडळींनी त्याचीच रि ओढली असून त्यामुळे आता या प्रकरणात काही कनिष्ठ कर्मचारी व कामगारांचा बळी देवून थातूरमातूर कारवाया करीत विद्यापीठातील कुलगुरू सह प्रशासन राम निराळे होतील, असे स्पष्ट संकेत आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा