हिंगोलीतील त्या दोघांचा अहवाल निगेटीव्ह
हिंगोलीतील त्या दोघांचा अहवाल निगेटीव्ह
हिंगोली - हिंगोली शहरात पुणे व दुबई येथून आलेल्या दोघांना संशयीत नव्हे तर खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवसापुर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपाचार करून त्याचे रिपोट तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता.१६) त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयात मिळाला असून त्या दोघांचाही रिपोट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.
या बाबत माहिती अशी की, येथील जिल्हा सामान्य रुग्णांलयात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या दोन संशयीतावर सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी उपचार सुरू करण्यात आले आहेत. यात एक पुणे येथून तर दुसरा दुबई मार्गे दोघेही ट्रव्हल्सने सकाळी आले होते. दोघांनाही सुरक्षीततेच्या दृष्टिकोनातून उपचारखाली ठेवले आले होते.
हिंगोली जिल्ह्यात कोरानाचा अद्याप एकही रूग्ण आढळुन आलेला नाही. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सर्व उपाय-योजना व जनजागृती केली जात आहे. परंतु दोन दिवसापुवी उपचारासाठी दाखल झालेल्या दोन संशयीतावर उपचार सुरू होते. केवळ संशयीत म्हणून या दोघांना उपचाराखाली ठेवण्यात आले होते. हे दोघे प्रवासी ट्रॅव्हल्सने आल्यानंतर त्यांना कोरोनासी साम्य असलेली काही लक्षणे असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर दोघेही सामान्य रुग्णालयात उपचारासाठी गेले होते.
त्यांनतर दोघांनी प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असता जिल्हा सामान्य रुग्णालयात या दोघांचेची बल्ड स्टेट, एक्सरे, केपीटी, एलएफटी, सीबीसी, सॅप सॅम्पल आदींची तपासणी करून रिपोट पुणे येथील प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी पुणे येथील प्रयोग शाळेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या दोन संशयीत रुग्णाचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना बाबतच्या भितीचा सुटकारा सोडला आहे. त्यामुळे नागरीकांनी कोरोना बाबत भिती बाळगण्याची गरज नाही मात्र खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.