गंगाखेड शुगर गळीत हंगामाची लगबग सुरू बायलर पेटणार,बँक व कारखाना प्रशासनाची तयारी सुरू.
गंगाखेड शुगर गळीत हंगामाची लगबग सुरू बायलर पेटणार,बँक व कारखाना प्रशासनाची तयारी सुरू...
गंगाखेडःप्रतिनिधी
मराठवाड्यातील सर्वाधिक गाळप क्षमता आसलेला गंगाखेड शुगर अँन्ड एनर्जी कारखानाचा आगामी गाळप हंगाम बँक प्रशासन व कारखाना प्रशासन यांचा वतीने सुरू करण्यात येणार आसून चार दिवसात डिसलरी प्लाँन्ट सुरू करण्यात येणार आहे.वेळेतच गंगाखेड शुगरचे बायलर पेटणार आसल्याचे बँक प्रशासक अंकूरकुमार श्रीवास्तव व कारखान्याचे एमडी राजेंद्र डोंगरे यांनी पञकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
गंगाखेड शुगर अँन्ड एनर्जी चा कार्यालयात घेण्यात आलेल्या पञकार परिषदेत बँक प्रशासक अंकूरकुमार श्रीवास्तव कारखान्याचे एमडी राजेंद्र डोंगरे उपस्थित होते यावेळी बँक प्रशासक अंकूरकुमार श्रीवास्तव म्हणाले की एनसीएलटी न्यायालयाचा वतीने गंगाखेड शुगरवर प्रशासक म्हणुन माझी नियुक्ती आसून त्या अधिकारात कामकाज सुरू आहे.परभणी जिल्हातील तथा कारखाना क्षेञातील उस उत्पादक शेतक-यासाठी वरदान आसलेला गंगाखेड शुगर मागील वर्षाचा दुष्काळी परीस्थितीमूळे व पुरेशा प्रमाणात उस उपलब्ध नसल्याने मागील वर्षी गाळप हंगाम बंद ठेवावा लागला होता.यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसामुळे कारखाना परिसरातील सर्व पाण्याचे स्ञोत भरभरून वाहात आसल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे.मागील तीन ते चार वर्षा पासून गंगाखेड शुगरवर आरोप प्रत्यारोप सुरू आसून कारखान्याचे चेअरमेन आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचावर अर्थीक व्यवहाराचा आरोपाने राजकारण ढवळून निघाले कारखान्यावर अर्थीक निर्बध आले.अर्थीक परिस्थिती बिकट आसताना मागील वर्षाचा गळीत हांगामातील शेतकऱ्यांच्या उसाची एफ आर पी नुसार संबधित उस उत्पादक शेतकऱ्यांच्या देणी अदा करून इतर देणी कारखाना स्तरावरून देण्यात आली.मागील वर्षाचा गाळप हंगाम न झाल्याने गंगाखेड बाजारपेठेत अर्थीक मंदीची लाट दिसुन आली तर उस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता हजारो उसतोड कामगार बेरोजगार झाले कारखान्याची अधुनिकता उसाची उपलब्धता व शेतकऱ्यांच्या भरभराटीसह गंगाखेड बाजारपेठेचा उन्नतीसाठी गंगाखेड शुगरची निर्मिती केल्याचे अंकूरकुमार श्रीवास्तव यांचा निदर्शनात आणून दिल्या नंतर व सर्व बाबी पडताळणी नंतर मागील दहा वर्षात प्रत्येक गाळप हंगामात उत्तरोत्तर चांगली कामगीरी आसल्याने येणाऱ्या २०२०-२१ गळीत हंगाम बँक प्रशासक व कारखाना प्रशासनाचा वतीने सुरू करण्याचे अंकूरकुमार श्रीवास्तव व राजेंद्र डोंगरे यांनी पञकार परिषदेत जाहिर केले.याची जय्यत तयार सुरू करण्यात आली आसून चार दिवसात डिसलरी प्लाँन्ट चा शुभारंभ होणार आसून लवकरच गंगाखेड शुगरचे बायलर पेटणार आहे.गंगाखेड शुगर संबधित उस उत्पादक शेतकरी उस वाहतुकदार कामगार कर्मचारी सभासद सह कारखाना संबधितानी सहकार्य करण्याचे आव्हान बँक प्रशासक अंकूरकुमार श्रीवास्तव व राजेंद्र डोंगरे यांनी केले आहे...