जिल्ह्यात १३५६ शौचालयाचे बांधकाम अद्यापही अपूर्णच!

जिल्ह्यात १३५६ शौचालयाचे बांधकाम अद्यापही अपूर्णच!


हिंगोली - जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना बेसलाईन सर्व्हे नुसार दिलेले
 शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण न करता आल्याने अद्यापही १ हजार ३५६  शौचालयाचे बांधकाम बाकी आहेत.


 केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेला ग्रामीण भागात हागणदारी मुक्त करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येते. त्यानुसार पाणी व स्वछता विभागाच्या वतीने तज्ज्ञांच्या मार्फत सर्व्हेक्षण करून लाभार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर प्रत्येकी बारा हजार या प्रमाणे शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.यामध्ये पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या कुटुंबाचा समावेश केला आहे.


जिल्ह्याला बेस लाईन सर्व्हे नुसार 
(एलओबी)पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या कुटुंबासाठी  २२ हजार ६३२ सौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले होते. यामध्ये वीस हजार २७६ शौचालयाचे बांधकामे पूर्ण झाली तर १३५६
 शौचालयाचे बांधकामे आद्यपही शिल्लक आहेत. यासाठी ग्रामसेवकाना शौचालय पूर्ण करण्यासाठी १६ मार्चची मुदत दिली होती. वारंवार सांगूनही तरी देखील सौचालयाचे बांधकामे पूर्ण झाली नाहीत. आता तर उपसचिवानी व्हीसी द्वारे सौचालय पूर्ण करण्यासाठी २३ मार्चची डेडलाईन दिली आहे. तालुका निहाय अपूर्ण असलेल्या शौचालय बांधकामात हिंगोली तालुका पहिल्या क्रमांकावर असून ५२३ शौचालयाचे बांधकाम बाकी आहे. त्याखालोखाल सेनगाव ४६८,कळमनुरी ३३७,औंढा२८,तर वसमत तालुक्याने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे आजघडीला वसमत तालुक्यात एकही सौचालय बांधकाम बाकी नाही. त्यामुळे शौचालयाच्या बाबतीत वसमत तालुक्याने आघाडी घेतली आहे.


दरम्यान, सीईओ राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे, धनवंत कुमार माळी, आत्माराम बोन्द्रे यांनी मागील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला तालुका समन्वयक कक्षातील तज्ञ आदींची उपस्थिती होती. यावेळी ग्रामसेवकाना १६मार्च अखेर मुदत दिली होती. या मुदतीत सौचालय बांधकामे पूर्ण करता आली नाहीत. पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची राज्याच्या उप सचिवानी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली, यात जिल्ह्यातील पायाभूत सर्व्हेक्षण अंतर्गत सुटलेल्या कुटुंबाचा सौचालय बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपसचिवाने जिल्ह्यातील सौचालयाच्या बांधकामाची सद्य स्थिती समाधानकारक असल्याचे सांगून आता अपूर्ण कामे २३ मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निधी खर्च न झाल्यास ३१ मार्च नंतर उर्वरित सौचालयाचा निधी वापस गेल्यास संबंधितांना  जबाबदार धरले जाणार आहे.


सौचालय बांधकामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा कक्षातील तज्ञ राजेंद्र सरकटे,विष्णू मेहत्रे, राधेश्याम गंगासागर, ईश्वर पडोळे, संतोष कायंदे, श्यामसुंदर मस्के, प्रशांत कांबळे, रघुनाथ कोरडे, रेणूकादास कठारे ,अमोल देशपांडे परिश्रम घेत असून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन भेटी देत आहेत. वेळेत सौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे आवाहन करीत आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा