बहुर गावातही बाहेर गावातील नागरिकांना नो एंट्री
बहुर गावातही बाहेर गावातील नागरिकांना नो एंट्री
बाळापूर - कोरोना विषाणूच्या भीतीपोटी आता बहुर गावातील नागरिकांनी देखील बाहेर गावातील नागरिकांना गावात येण्यासाठी प्रवेश बंदी केली असून सर्व रस्त्यावर काट्या टाकून नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत.
कळमनुरी तालुक्यातील बाळापूर नजीक असलेल्या बहुर गावातील नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग पसरवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाचे पालन करीत असून संचारबंदीच्या काळात स्वतःला घरात कोंडून घेतले आहेत. मात्र इतर ठिकाणी कामासाठी गेलेले मजूर किंवा नागरिकांना गावात येण्यासाठी प्रवेश बंदी केली आहे.यापूर्वी कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकऱ्यांनी देखील असाच निर्णय घेतला होता. आता त्याच धर्तीवर बहुर गावातील नागरिकांनी कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात गेली आठ दिवसापासून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरु केले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुविधा वगळून इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील सीमा देखील बंद केल्या आहेत. रेल्वे गाड्या, बससेवा, सुद्धा बंद केल्याने जिल्ह्यातील कामानिमित्त गेलेले नागरिक, विद्यार्थी बाहेर राज्यात अडकून पडले आहेत. आता या नागरिकांना घरची ओढ लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाहेरच्या नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी बंदी घातली आहे. त्यानुसार बहुर गावातील नागरिकांनी देखील बाहेर गावातील व बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना १४एप्रिल पर्यंत प्रवेश बंदी घातली आहे.
यासाठी किसन कोकरे , पोलीस पाटील रमेश महाजन, विजय कोकरे, शिवाजी कोकरे ,पंजाबराव कोकरे, विशाल परसराम महाजन, बजरंग कोकरे, सचिन मगरे, विशाल खंदारे, बाळू मगरे, चंद्रकांत खंदारे, सुरेश मगरे, गंगाधर कोकरे, सुभाषराव कोकरे, वैजनाथ कोकरे, प्रभाकर गवारे, संतोष कोकरे ,धनाजी खोकले,सरपंच संतोष भुरके आदीनी पुढाकार घेतला आहे.