राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिवपदी परमेश्वर इंगोले
हिंगोली - राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी येथील परमेश्वर इंगोले पाटील यांची निवड झाल्याचे तसे पत्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सोपविले आहे.
गेल्या अनेक वर्षा पासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक तसेच शेतकऱ्यांचा प्रश्नावर परमेश्वर इंगोले पाटील यांनी नेहमी सरकारच्या विरोधात आवाज उठविलेला आहे.तसेच सामाजिक समस्यांसाठी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे,उपोषण केले आहेत. व त्यांचा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चळवळीत काम करणाऱ्या युवकांसोबत दांडगा संपर्क आहे. या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी परमेश्वर इंगोले पाटील सोबत काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनेच्या युवकांची मुंबई येथे बैठक घेतली. त्या बैठकीत शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पक्षाचा माध्यमातून तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षांमध्ये काम करण्याचे सर्वांच्या मताने ठरविण्यात आले.
या नंतर खा.शरदचंद्र पवार यांच्या आदेशावरून अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक अध्यक्ष महेबूब शेख यांचा नेतृत्वाखाली पक्षाचे विचार तळागाळापर्यन्त पोहचविण्यासाठी, पक्ष मजबुतीसाठी राष्ट्रवादी युवक काँगेस, महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ.राजू नवघरे आमदार आदितीताई नलावडे श्री.संजय बोरगे राष्ट्रवादी डॉक्टर सेल प्रदेशअध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, प्रदेश अध्यक्ष मेहुबब शेख ,प्रदेश कार्यध्यक्ष रविकांत वरपे ,प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण , राष्ट्रवादी पक्षाच्या आदी कार्यकर्त्यांनी इंगोले यांचे अभिनंदन केले आहे.