सीईओ शर्मा यांनी घेतला कोरोना विषाणूचा आढावा चेकपोस्ट, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी

सीईओ शर्मा यांनी घेतला कोरोना विषाणूचा आढावा


चेकपोस्ट, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी


हिंगोली - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासना कडून प्रयत्न चालविले आहेत. गुरुवारी (ता.२६) जिल्हा परिषदेचे सीईओ आर.बी.शर्मा यांनी दोन क्वारांटाइन इमारतीची पाहणी करून चेक पोस्ट व प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला.


यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, पशु संवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले,आदींची उपस्थिती होती. दरम्यान, सीईओ शर्मा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या प्रत्येकी शंभर बेडच्या स्वातंत्र इमारतीची पाहणी केली. त्यानंतर हे पथकाकडून कण्हेरगाव येथील चेकपोस्टची पाहणी करून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर हे पथक फाळेगाव येथे दाखल होताच प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन ,कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शर्मा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी,सोयी सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून घेतली. याशिवाय जिल्ह्यात लोक आऊट केल्याने बाहेर जिल्ह्यातील परतलेल्या नागरिकांच्या नोंदी घेऊन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्यास तातडीने संपर्क साधून त्यास आयसोलेशन वॉर्डात दाखल करून उपचार करणे सोयीचे होईल याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी सीईओ शर्मा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा