एमआयटी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १०० बेडचे स्वतंत्र कक्ष
एमआयटी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात
कोरोना रुग्णांसाठी १०० बेडचे स्वतंत्र कक्ष
एमआयटीचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड
लातूर - लातूर येथील एमआयटी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी अद्यावत सोयींनीयुक्त शंभर बेडचा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असल्याची माहिती एमआयटीचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड यांनी दिली.
कोरोना या या विषाणूने भारतासह संपूर्ण जगात हाहाकार माजला असून करोना विरुद्धचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन केले आहे. या आजारावरील रुग्णांसाठी प्रशासनाच्या वतीने अनेक प्रयत्न केले जात आहे.
लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना रुग्णासाठी स्वतंत्रपणे शंभर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे याकरिता स्पेशल सहा रूम निर्माण करण्यात आल्या असल्याचे सांगून रमेशअप्पा कराड म्हणाले की तज्ञ डॉक्टर सह इतर कर्मचारी, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदी सुसज्ज ठेवण्यात आले आहे.
करोना स्वतंत्र कक्षासाठी प्रमुख म्हणून डॉ. गजानन गोंधळी मो. 8087733314 सहप्रमुख डॉ. विशाल भालेराव मो. 9637497430 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आरोग्य विभागातील नियमाचे पालन करून दोन बेड मधील अंतर पाच फुटापेक्षा अधिक ठेवून हा कोरोना कक्ष निर्माण केला आहे. या कक्षात येणाऱ्या प्रत्येकांना मास्क दिले जाणार असून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजनाची सोय केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी गरज पडल्यास या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार मो. 9422071032 यांच्याशी संपर्क करावा असेही आवाहन रमेशअप्पा कराड यांनी केली आहे.