अत्यावश्यक सेवा सोडून सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद 

अत्यावश्यक सेवा सोडून सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद 


बाजारपेठ बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


हिंगोली - कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी (ता.२१) जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवत प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.


जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने कंबर कसली असून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुविधा यात किराणा, मेडिकल, भाजीपाला सोडून इतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.


 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी रविवारी नागरिकांना रविवारी घरात बसून राहण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे बऱ्याच प्रमाणात का होईना यावर मात करण्यासाठी या उपाययोजना केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी एकत्र जमा होऊ नये यासाठी गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी आता हॉटेल,पान टपरी, ऑटोरिक्षा,बेकरी, स्वीटमार्ट, धाबे, चाट भांडार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार हिंगोली, औंढा, वसमत, कळमनुरी, सेनगाव , या पाचही तालुक्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. केवळ बाजारपेठ बंद ठेवल्याने नागरिक मात्र भर उन्हात गाडीवरून फिरत होते.


आझम कॉलनी येथील काही व्यवसायिकांनी दुकाने बंद केली नसल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून दुकाने बंद करून दहा ते पंधरा व्यापाऱ्यांना शहर पोलीस ठाण्यात आणून समज दिली. तर ऑटो बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही आदेश डावलून रस्त्यावर भरधाव वाहतूक करणाऱ्या दहा ते पंधरा ऑटोचालकावर कारवाई करण्यात आली.वसमत, औंढा, कळमनुरी,सेनगाव याठिकाणी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली होती. तर यातून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगळल्या होत्या.
हिंगोली शहरातील बँका सुरु असल्याने बँक ऑफ बडोदा या ठिकाणी पैस्याचे व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर काही एटीएम केंद्रावर नागरिक पैसे काढण्यासाठी दिसून येत होते. कळमनुरी येथे ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत गर्दी दिसून आली.


कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून नागरिकांना, मुलांना घरात बसावे ,बाहेर फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी टाळावे असे असताना लहान मुले चक्क गल्ली, मैदानावर खेळत होती. तर नागरिक ही शहरातून फेरफटका मारत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.


खाजगी, महामंडळ बससेवा सुरु 
---------------------------------------
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशाशन पुरेपूर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना, जनजागृती करीत असताना खाजगी वाहने, महामंडळाच्या बसेस मात्र रस्त्यावरून धावत होत्या.काही मार्गावर प्रवाशीच नसल्यामुळे त्या ठिकाणच्या बसेस बंद केल्यामुळे बसस्थानकात देखील प्रवाश्यांची गर्दी दिसून येत होती. गर्दी कमी करण्यासाठी आगार प्रमुखाकडून  कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे बसस्थानकात बाहेर गावी जाणारे प्रवासी अडकून पडल्याचे चित्र होते .तर बसमधून उतरलेल्या किंवा चढणाऱ्या प्रवाश्यासाठी सानिटायझरची व्यवस्था केली नाही. चालक, वाहक यांना देखील केवळ मास्क दिले असून सानिटायझर दिले नाही. कारण बसमधून शेकडो प्रवाशी प्रवास करीत आहेत. कोणता प्रवाशी कुठून आला याची नोंद सुद्धा आगार प्रमुखा कडे नाही. त्यामुळे बसस्थानक ठिकाणी धोका होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा