औंढा येथे पत्रकार मारहणीच्या निषेधार्थ निवेदन
औढा नागनाथ - पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून सोमवारी (ता.३०) तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना औंढा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे निषेधाचे निवेदन दिले आहे.
या बाबत बाळासाहेब साळवे , प्रभाकर स्वामी, कृष्णा ऋषी, दत्तात्रय शेगुकर, विलास काचगुंडे , यांनी हे निवेदन दिले आहे. या निवेदनावर नमुद केले की, हिंगोली येथील पत्रकार कन्हैया खंडेलवाल, यांना केलेल्या मारहाणीस जबाबदार असणारांना निलंबीत करावे
त्यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत
आमच्या विरोधात बातम्या करतो का असं म्हणत हिंगोलीत एका सहाय्यक पोलिस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कन्हैय्या खंडेलवाल यांना बेदम मारहाण केली. तसेच पोलिसांच्या झुंडीनं त्यांच्यावर हल्ला केला. एवढंच नाही तर एपीआय चिंचोळकर यांनी त्यांच्या कानशिलावर पिस्तूल ठेवून विरोधात बातम्या करतो. पण आता तुला जिवंत ठेवणार नाही. मला कुणीच काही करणार नाही, म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. खंडेलवाल यांना पोलिस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण केली. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णांलयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोलकर ह्यांना व त्यांचे सोबतचे सहकारी कर्मचारी यांना तात्काळ निलंबीत करावे, पत्रकार संरक्षण कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात यावा. जिल्हा पोलीस अधिक्षक यांची तात्काळ बदली करण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून या सर्व घटनांचा हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.
![]() | ReplyReply to allForward |