अर्थसंकल्पात औंढा, नरसी नामदेव साठी भरीव तरतूद
हिंगोली - राज्य सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला असून कही गम तर कही खुश असा समाधानकारक हा अर्थसंकल्प आहे. जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ देवस्थान तीर्थक्षेत्र आणि संत नामदेवांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव तिर्थक्षेत्राला भरीव निधीची तरतूद केली असल्याने भाविकात समाधान व्यक्त होत आहे.
तसेच कृषी, सिंचन क्षेत्रासाठी देखील भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार अभियान योजनेत ही मागील सरकारच्या काळात अपूर्ण कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे. तर दोन लाखपुढील कर्जाची परतफेड केल्यास दोन लाखाचे पीक कर्ज माफ होणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यास पन्नास हजार प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत शेतकऱ्यातून होत आहे. तसेच महिला व युवक यासाठी भरपूर योजना असून त्यासाठी देखील सरकारने भरघोस निधीची तरतूद केली आहे.
![]() | ReplyReply to allForward |