आगीत जळालं घर, दारापुढची म्हैस होरपळून दगावली.

आगीत जळालं घर, दारापुढची म्हैस होरपळून दगावली.


 उदगीर (संगम पटवारी)तालुक्यातील हेर येथे शुक्रवारी (ता.27) रात्री दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घरासमोर बांधलेली एक म्हैसही आगीत होरपळून दगावली आहे.


हेर गावातले रहिवासी संतोष सोपान सुर्यवंशी, शितल सुर्यवंशी, भक्ती सुर्यवंशी, पुनम सुर्यवंशी, महारूद्र सुर्यवंशी हे सर्व जण राञी जेवण करून अंगणात झोपी गेले. रात्री बाराच्या सुमारास वादळ, सोसाट्याचा वारा सुटला होता. तेव्हा या वादळवाऱ्यात अचानक घराला आग लागली व जोराचा वारा असल्याने ती चांगलीच भडकली.


या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य, घरातील सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी, गहू, दाळी, कपडे, नगदी रक्कम आठ हजार, चाळीस पत्रे, एक तोळा सोने, शिलाई मशीन, हे काही वेळेतच जळून खाक झाले. तसेच घरासमोर बांधलेली एक 70 हजार रुपये किंमतीची म्हैसही दगावली आहे. म्हशीची पाहणी पशु पर्यवेक्षक नारायण मुळे यांनी सुर्यवंशी यांच्या घरी जाऊन केली.


या आगीत सुर्यवंशी यांचे एकंदरीत तीन लाखाचे  नुकसान झाले आहे. पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी पंडीत जाधव, कनिष्ठ अभियंता सतिष जाधव, पशुधन पर्यवेक्षक नारायण मुळे, तंटामुक्तती अध्यक्ष बळवंत घोगरे, पोलीस पाटील एकनाथ कसबे, भागवत गुरमे, गोविंद कोंपले, धनाजी माटेकर, प्रभु हुडगे, राजकुमार तवंडे, अविनाश सुर्यवंशी आदी पंचनामा करण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी गावातील नागरिक भागवत गुरमे, राजकुमार तवंडे, विलास कांबळे, मंडळ अधिकारी पंडित जाधव यांच्या वतीने साडेतीन हजार रूपयांची मदत करण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नाही.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा