मासिक सभेवर प.स.सदस्यांचा बहिष्कार

मासिक सभेवर प.स.सदस्यांचा बहिष्कार


बिडिओंची गैरहजेरी, सीईओकडे तक्रार 


हिंगोली - पंचायत समितीच्या मासिक बैठकीला गटविकास अधिकारी नेहमीच गैरहजर असल्याची बोंबाबोंब असल्याने ग्रामीण भागातील कामे खोळंबली असल्याचे कारण पुढे करीत शुक्रवारी आठ ते दहा सदस्यांनी मासिक बैठकीवर बहिष्कार टाकत सभा तहकूब केली. त्यानंतर सदस्यांनी प्रभारी सीईओ धनवंतकुमार माळी यांच्याकडे तक्रार केली.


हिंगोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे यांच्याकडे जिल्हा परिषदेचा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना दोन्ही कडील कारभार पाहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांनी सचिव म्हणून विस्तार अधिकारी विष्णू भोजे यांना सभेला पाठविले होते. मात्र सदस्यांनी गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे हे मासिक सभेच्या बैठकीला नेहमीच गैरहजर असल्याचे कारण पुढे करीत सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला.


येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी (ता.१३)सभापती लक्ष्मीबाई
 झुळझुळे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभेचे आयोजन केले होते .परंतु आजपर्यंत पंचायत समिती सभापती, उपसभापती यांची निवड होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी या तीन सभेला गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे हे गैरहजर राहत असल्याने ग्रामीण भागातील विकास खुंटला आहे.आज होणाऱ्या सभेत विकास कामाचे विविध ठराव पारित केले जाणार होते. मात्र गटविकास अधिकारी हजर नसल्याचे कारण समोर करीत सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकत जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ धनवंतकुमार माळी यांच्याकडे निवेदन सादर केले. निवेदनावर गंगाबाई गावंडे, कावेरी कऱ्हाळे,मीनाबाई असोले, गणेशराव गूडधे, ज्ञानबा कवडे, विलास काठमोडे, भागूबाई आगलावे, बबन नेतने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


पंचायत समितीच्या सभागृहात
 एकूण २२ सदस्य संख्याबळ आहे. अर्धेअधिक सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने सभेला १/३सदस्य असणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश सदस्य गैरहजर असल्याने कोरम अभावी सभा तहकूब केल्याचे तात्पुरते सचिव विष्णू भोजे यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा