जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था राहणार बंद
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था राहणार बंद
हिंगोली - जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व जीवित हानी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवारी( ता.१७) काढले आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे शोशल मीडिया व इतर माध्यमातून निदर्शनास येत आहे. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच मार्च रोजीच्या पत्रकान्वये कोरोना व्हायरस प्रतिबंध आराखडा तयार केला आहे.त्यानुसार जिल्ह्यात कोरोना व्हायरस रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद ,सरकारी व खाजगी शाळा , महाविद्यालय आयुक्त, व्यावसायिक ,आणि प्रशिक्षण केंद यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी निर्गमित केले आहेत. दरम्यान दहावी, बारावी ,विश्वविद्यालयाच्या परीक्षा वेळापत्रका नुसार घेण्यात याव्यात असे आदेशात नमूद केले आहे.